सामाजिक कार्यकर्ते निलेशभाऊ गायवळ यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा गायवळ मित्रमंडळाच्या वतीने गोशाळेत चारा वाटप

0
182

जामखेड न्युज——

सामाजिक कार्यकर्ते निलेशभाऊ गायवळ यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा

गायवळ मित्रमंडळाच्या वतीने गोशाळेत चारा वाटप

 


सामाजिक कार्यकर्ते निलेशभाऊ गायवळ यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला आहे. अनेक ठिकाणी आरोग्य शिबिरे, जिल्हा परिषद व अंगणवाडी शाळेतील मुलांना खाऊ वाटप, गोशाळेतील गायींना हिरवा चारा वाटप करण्यात आले.

श्री साकेश्वर गोशाळेतील गायींना हिरवा चारा वाटप करताना किशोर गायवळ, बापू कदम सर, भरत वाघोले सर, निखिल आरडे सर, समीर गायकवाड सर, हर्षद ढाळे, योगेश सुरवसे, बबलू गोलेकर, गोवर्धन कडू, अभिमान पोते, विशाल दौंड, पांडुरंग भोसले, मनसेचे तालुकाध्यक्ष प्रदिप टाफरे, जामखेड मिडिया क्लबचे अध्यक्ष सुदाम वराट, युवा मोर्चा भाजपा तालुका सरचिटणीस तुषार बोथरा, धनराज पवार, रमेश बोलभट, मयूर भोसले, संतोष पवार, बी. एस. शिंदे, जयसिंग उगले, खंडागळे नाना, आजीनाथ पुलवळे यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

गायवळ बंधू हे सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात. कोरोना काळात अनेक गोरगरीब व निराधारा जनतेला आधार देण्याचे काम केले होते. औषधांचा पुरवठा, दुष्काळाच्या काळात जनतेला पाणीपुरवठा करण्यात आला होता. तसेच कुटुंबातील कोणाचाही वाढदिवस ते गोशाळेतील गायींना हिरवा चारा, पुरणपोळी,देऊन वाटप करून वाढदिवस साजरा करतात

 

जामखेड तालुक्यातील श्री शिवप्रतिष्ठाण संचलित साकेश्वर गो – शाळा येथे सामाजिक कार्यकर्ते मा.निलेन (भाऊ) गायवळ यांच्या वाढदिवसा निमित्त ७० गायींना ३ दिवस पुरेल इतका हिरवा चारा देण्यात आला.

मनसे तालुका अध्यक्ष प्रदीप भाऊ टापरे यांनी निलेश भाऊ यांनी कोविड काळामध्ये आरोळे हॉस्पिटलला लाखो रुपयांच्या औषधी मदत केली तसेच दुष्काळ काळात पाणी वाटप केले विविध शासकीय कार्यालयांना हॅन्ड सॅनिटायझर मशीन दिले त्यांचे उपक्रम चांगले असतात.

प्राध्यापक रमेश बोलभट यांनी निलेश भाऊंचे कार्य चांगले आहे अडचणीच्या काळातील नेहमीच समाजाला मदत करत असतात.

किशोर गायवळ यांनी
निलेश गायवळ व गायवळ कुटुंब हे नेहमी आपला वाढदिवस गोशाळे साजरा करत असतात व निलेश भाऊंच्या माध्यमातून विविध तसेच समाजाचा कार्य चालू आहे असे मनोगत व्यक्त केले.

शिवप्रतिष्ठान तालुकाप्रमुख पांडुरंग भोसले यांनी व गो शाळेमध्ये गायवळ कुटुंब नेहमीच वाढदिवस साजरा करतात व सर्व मित्र परिवारांचे वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे आभार बापू कदम यांनी मानले.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी निलेश (भाऊ) गायवळ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here