नगरपरिषदेने अतिक्रमणीत टपऱ्या हटविल्याने हुतात्मा स्मारकाच्या सुशोभीकरणाच्या मार्ग मोकळा

0
204

जामखेड प्रतिनिधी

  नगरपरिषदेच्या हद्दीत असणार्‍या बाजारतळातील असणार्‍या अनाधिकृत टपऱ्या हटविण्याचे काम आज पोलीस बंदोबस्तात नगरपरिषद प्रशासनाने हाती घेतल्याने अतिक्रमणात अडकलेला हुतात्मा स्मारक
( विजयस्तंभाने) मोकळा श्वास घेतला आहे. आता बाजारासाठी लोकांना जागा मोकळी झाली आहे. व विजयस्तंभाचे सुशोभीकरण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
   जामखेड नगरपरिषदेच्या हद्दीत काही अधिकारी व पदाधिकारी यांनी संगनमत करून सुमारे 25 अनाधिकृत टपऱ्या झालेल्या होत्या. यामुळे बाजारतळात गर्दी झाली होती यात स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मरणार्थ बांधलेले हुतात्मा स्मारक मोकळे झाले आहे. माजी सैनिकांनी या स्मारकाचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. नगरपरिषदेच्या नियमानुसार सुशोभीकरण करण्यात येईल असे माजी सैनिकांनी सांगितले.
  25 टपऱ्यांपैकी 12 टपऱ्या स्वतः होऊन टपरीधारकांनी काढल्या 7 टपऱ्या प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात काढल्या तर सहा टपरी धारकांचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे त्या टपरी धारकांना विशिष्ट मुदत देऊन टपरीचे कागदपत्रे सादर केले नाहीत तर आम्ही त्याही टपऱ्या हटविणार आहोत. यातील दोन टपऱ्या नगरपरिषद रेकॉर्ड वर आहेत पण जाग्यावर टपऱ्या नाहीत. एक टपरीचे दोन वर्षांत चार मालक झाले आहेत. योग्य तपासणी करून योग्य तो निर्णय घेतला जाईल.
    चौकट
अनाधिकृत टपऱ्या हटविल्याने ही जागा सार्वजनिक लोकांची होती ती सार्वजनिक वापरासाठी मोकळी झाली आहे. बाजारात लोकांना बसण्यासाठी मोकळी जागा झालेली आहे. तसेच हुतात्मा स्मारकही मोकळे झाल्याने सुशोभीकरण करण्यात येणार आहे.
(मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते जामखेड)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here