ग्रामपंचायतींसाठी दिवसभरात 128 अर्ज दाखल

0
306

जामखेड प्रतिनिधी

  तालुक्यातील 49 ग्रामपंचायतींच्या निवडणूकीसाठी गेल्या पाच दिवसांपासून गाव पुढाऱ्यांची लगबग सुरू आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तहसिल कार्यालयात मोठी गर्दी होती आज दिवसभरात 49 पैकी 19 ग्रामपंचायतीचे 128 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. उद्या व परवा दोन दिवसात बाकी अर्ज दाखल होतील.
     जामखेड तालुक्यातील 58 पैकी 49 ग्रामपंचायतींच्या निवडणुका आहेत. दि. 23 पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नव्हता दि. 24 रोजी पाटोदा दोन, पिंपरखेड दोन, दिघोळ तीन, नान्नज दोन, खर्डा एक असे दहा अर्ज दाखल झाले होते. नंतर सलग तीन दिवस शासकीय सुट्ट्या होत्या.
   आज दिनांक 28 रोजी 128 अर्ज दाखल झाले आहेत. ते पुढीलप्रमाणे
धोंडपारगाव  01, गुरेवाडी 02, आपटी 07, आनंदवाडी 05,  बांधखडक 04, खुरदैठण 01, चौंडी 07, डोणगाव 02, कवडगाव 01, तरडगाव 03, घोडेगाव 01, नाहुली 03, साकत 12, पाटोदा 09, पिंपरखेड 38, दिघोळ 12, खर्डा 06, नान्नज 06, धामणगाव 08 असे एकुण 128 अर्ज आज दाखल झाले आहेत.
   दि 29 व 30 हे दोन दिवस उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी बाकी आहेत.
  कागदपत्रे गोळा करता करता पॅनल प्रमुख गाव पुढाऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. तर काही ग्रामपंचायतींसाठी आणखी बिनविरोधचे प्रयत्न सुरू आहेत. गाव पातळीवर पक्ष विरहित गटा गटाचे राजकारण आहे. आपल्या गटाच्या ताब्यात ग्रामपंचायती घेण्यासाठी पुढाऱ्यांची लगबग तसेच अनेकांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here