जामखेड न्युज——
शिवप्रभुदौडीत महाराष्ट्रात जामखेडचा माऊली सोनवणे दुसरा
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान च्या वतीने माऊलीस चांदीचे कडे बहाल
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान जामखेड तालुक्याच्या वतीने शिवप्रभुदौडीत महाराष्ट्रात दुसरा माऊली सोनवणे यास चांदीचे कडे बहाल

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनचे संस्थापक गुरुवर्य संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली
श्रीक्षेत्र भीमाशंकर ते शिवनेरी गडकोट मोहीम यावर्षी संपन्न झाली त्यामध्ये महाराष्ट्रातील दीड लाख च्या वर मावळे सहभागी झाले होते.या किल्ले मोहीमेत जामखेड तालुक्यातील ३५० मावळे सहभागी झाले होते.
मोहिमेमध्ये समारोप दिवशी शिवप्रभू दौड घेतली जाते यामध्ये सर्व महाराष्ट्रातून तरुण सहभागी होतात.
या शिवप्रभुदौडीत महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्याचा सहभाग घेतला जातो महाराष्ट्रातून ३०० स्पर्धक सहभागी झाले होते या मध्ये जामखेड तालुक्यातील नायगाव येथील धारकरी माउली सोनवने हा शिवप्रभुदौडी मध्ये दुसरा क्रमांक आला.

ही शिवप्रभुदौड म्हणजे चार दिवस मोहिमेत पायी चालुन पाठीवर चार दिवसाची शिदोरी डोगंरदरयातुन हि गडकोट मोहिम असते आणि शेवटी समारोपावेळी महाराष्ट्रातुन आलेल्या प्रत्येक गावातील एका मावळ्यास या स्पर्धेत सहभागी होता येत यावेळी जो पहिला क्रंमाक पटकावेल त्यास भगवा ध्वजाचा मान मिळतो यावेळी कोल्हापूरचा धारकरी प्रथम आला आणि दुसरा क्रंमाक जामखेड येथील नायगावचा माउली सोनवने या मावळ्याचा आला

यावेळी गडकोट मोहिमेचा भंडारा महाप्रसादाचे नागेश्वर मंदिर येथे आयोजन करुन सर्व धारकरी शिवप्रेमीचे एकत्रीकरण करुन सर्वानीं आपआपल्या गावात धर्मवीर बलिदान मास पाळण्यात यावा असे आहवान श्री शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष पांडुरंग मधुकर भोसले यांनी केले यावेळी महाराष्ट्रातुन दुसरा क्रंमाक आलेल्या नायगावचा माउली सोनवने याचा ग्रामस्थच्या वत्तीने सत्कार करुन चांदीचे कडे बहाल केले तसेच महाप्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी शिवप्रेमीं मोठ्या संख्येने उपस्थितीत होते





