जामखेड न्युज——
संजय काशिद मित्रमंडळाच्या वतीने हळदी – कुंकू निमित्त भव्य लकी ड्रॉ
कार्यक्रमासाठी महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे निमंत्रक रोहिणी संजय काशिद यांचे आवाहन
शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशिद मित्रमंडळाच्या वतीने मकरसंक्रांतीनिमित्त हळदी – कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे यामध्ये लकी ड्रॉ चे आयोजन करण्यात आले आहे हळदी कुंकू समारंभसाठी येणाऱ्या प्रत्येक महिलेस हमखास बक्षीस दिले जाणार आहे. यामुळे कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त महिलांनी उपस्थित रहावे असे आवाहन निमंत्रक रोहिणी संजय काशिद यांनी केले आहे.
मकरसंक्रांतीच्या निमित्ताने जामखेड तालुका शिवसेना प्रमुख संजय काशिद मित्रमंडळाच्या वतीने खर्डा रोडवरील जगदंबा लाँन्स जामखेड येथे हळदी कुंकू निमित्त लकी ड्रॉ आयोजित करण्यात आला आहे. तसेच महिलांसाठी विविध प्रकारचे खेळ आयोजित केले आहेत. सहभागी महिलांना आकर्षक भेटवस्तू दिली जाणार आहे. येणाऱ्या सर्व महिलांना बक्षीस दिले जाणार आहे तेव्हा कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त महिलांनी उपस्थित रहावे असे आवाहन निमंत्रक रोहिणी काशिद यांनी केले आहे.
संजय काशिद मित्रमंडळाच्या वतीने नेहमीच शहरासह तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. नगर जिल्ह्यातील पहिली महिला आयोजित भव्य दिव्य शिवजयंती उत्सव साजरी करण्यात आली होती. परिसरातील वीर माता तसेच विधवा महिलांचा सन्मान करण्यात आला होता. याचबरोबर विविध क्षेत्रातील मान्यवरांचा मित्रमंडळाच्या वतीने सन्मान करण्यात आला होता.
शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने मोफत शिवकालीन शस्त्रक्रला प्रशिक्षणाचे आयोजन केले होते. यामध्ये मोठ्या प्रमाणावर महिला व मुलींनी सहभाग नोंदविला होता. स्व संरक्षणासाठी हे शिबीर खूपच उपयोगी पडले अशी प्रत्येक मुलांची भावना होती.
याचबरोबर परिसरात वृक्षारोपण, अनाथाश्रम. वृद्धाश्रम यांना मदत, विविध कार्यक्रम प्रसंगी रक्तदान शिबीराचे आयोजन असे विविध सामाजिक उपक्रम सतत चालू असतात.
मकरसंक्रांतीच्या निमित्ताने हळदी कुंकू निमित्त लकी ड्रॉ आयोजित करण्यात आला आहे यासाठी प्रथम बक्षीस पैठणी साडी, द्वितीय बक्षीस एक ग्रॅम नेकलेस तर तृतीय बक्षीस डिनर सेट याचबरोबर सहभाग घेणाऱ्या प्रत्येक महिलेस बक्षीस दिले जाणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी कार्यक्रमासाठी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजक सौ. रोहिणी संजय काशिद यांनी केले आहे.