जामखेड न्युज——
ल.ना.होशिंग विद्यालयात महिला विभागाच्या वतीने हळदीकुंकू समारंभ संपन्न
परदेशी प्रशिक्षणार्थी महिलांची विशेष उपस्थिती
ल.ना.होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मध्ये मकर संक्रांति निमित्त 16 जानेवारी 2023 रोजी दुपारी तीन ते पाच या वेळेत हळदीकुंकू व तिळगुळ समारंभ माता पालकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
याप्रसंगी पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा सौ उमाताई कोल्हे, सुनीताबाई गुगळे, सौ साधना होशिंग, सौ रेवती पारखे आदी महिला भगिनी उपस्थित होत्या, यावेळी भूगोल दिनानिमित्त काढण्यात आलेल्या रांगोळ्या व भरवण्यात आलेले प्रदर्शन पाहण्यासाठी सर्वांना खुले करून देण्यात आले होते. या सर्व प्रदर्शनाचा आनंद महिलांनी घेतला व अतिशय उस्फुर्त अशा प्रतिक्रिया देऊन या उपक्रमाचे सर्वाधिक कौतुक केले.
सर्व माता-पालक भगिनींनी संक्रातीचे वान म्हणून पर्यावरण प्रतिज्ञा कार्ड व तिळगुळ वाटप करण्यात आले.
यावेळी डॉ आरोळे हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षणासाठी आलेल्या युनिव्हर्सिटी अमंदा टेलर रेसावल्स येथील प्राध्यापिका श्रीमती अंमडा,श्रीमती रिसा, आणि अमेरिकन प्रशिक्षणार्थी महिलांची विशेष उपस्थिती लक्षवेधी होती. त्याचबरोबर जामखेड शहरातील मोठ्या संख्येने महिलाही उपस्थित होत्या.
त्यावेळी सर्व महिला शिक्षकांनी आलेल्या सर्व महिलांना शाळेतील विविध उपक्रम त्यामध्ये विद्यालयातील प्रदर्शन व बॉटनिकल, सर्व विषयांच्या शोकेस, मिसाईल प्रतिकृती, काष्ठशिल्प सर्व फिरून दाखवले या उपक्रमाबद्दल सर्वांनी शाळेचे मनापासून कौतुक केले.
या कार्यक्रमासाठी ल.ना.होशिंग माध्यमिक विद्यालयातील व ज्युनिअर कॉलेजच्या सर्व अध्यापिका उपस्थित होत्या यामध्ये श्रीमती संगीता दराडे, सौ वंदना डुचे,श्रीमती वंदना अल्हाट,सौ सुप्रिया घायतडक,सौ स्वाती सरडे, सौ सुरेखा गोंदकर,सौ पूजा भालेराव,सौ प्रमिला पोकळे, सौ स्वाती साबळे, श्रीमती प्रतीक्षा चव्हाण,सौ सुरेखा धुमाळ, सौ प्रभा रासकर,श्रीमती रेश्मा कारंडे,श्रीमती देविका फुटाणे, श्रीमती दिपाली बनसोडे,श्रीमती स्वाती जायभाय,या सर्व महिलांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी खूप मेहनत घेतली.
याबद्दल विद्यालयाचे प्राचार्य श्री श्रीकांत होशिंग साहेब,उपप्राचार्य श्री पोपट जरे,उपमुख्याध्यापक रमेश अडसूळ व पर्यवेक्षक श्री बाळासाहेब पारखे सर्वांनी महिला विभागाचे अभिनंदन केले.