जामखेड न्युज——
जामखेड जवळ साखरेचा ट्रक पलटी!!!
दिशादर्शक फलक नसल्याने साखरेचा ट्रक रस्ता चुकला
कोल्हापूर येथून बीड जिल्ह्यातील अंमळनेर येथे चालला होता पण खर्डा चौकात रस्ता चुकल्याने अरूंद रस्त्यावर जांबवाडी जवळ पलटी झाला मोठ्या प्रमाणावर साखरेचे पोते इकडे तिकडे पडले होते.
जामखेड शहरातील जांबवाडी येथे रस्त्यालगत काल रात्री १२ च्या सुमारास कोल्हापुर येथून बीड जिल्ह्यातील अंमळनेर येथे जाणारा साखरेचा ट्रक पल्टी झाला. याबाबत माहिती अशी की, दि. १० जानेवारी रात्रीच्या १२ सुमारास कुटे उद्योग समुहाचा MH 23 AU 3122 हा नंबर चा ट्रक कोल्हापुर येथून साखर घेवून बीड जिल्ह्यातील अंमळनेर येथे जात असताना जामखेड येथे खर्डा
चौक येथे दिशादर्शक फलक नसल्याने ट्रक चालक रस्ता चुकला.
पुढे जांबवाडी येथील अरुंद रस्ता असल्याने समोरून टॅक्टरला साईड देताना ट्रक पलटी सुदैवाने जीवितहानी टळली.
जामखेड शहरात सार्वजनिक बांधकाम विभागाने ठिकठिकाणी दिशादर्शक फलक लावणे गरजेचे आहे त्यामुळे अशा घटना घडणार नाहीत एकतर रोड खूप खराब झाले आहेत आणि त्याच्यात बोर्ड नाही. एखादा ड्रायवर जर रस्ता चुकला तर तो खूप लांबवर जातो. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने दिशादर्शक फलक लावणे खूप गरज आहे.
( सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी )