[contact-form][contact-field label=”Name” type=”name” required=”true” /][contact-field label=”Email” type=”email” required=”true” /][contact-field label=”Website” type=”url” /][contact-field label=”Message” type=”textarea” /][/contact-form]
जामखेड न्युज——
मी मंजूर केलेल्या कामाचे नारळ फोडण्याचे काम विरोधकांकडून अडीच वर्षे चालू आहे. – आमदार प्रा. राम शिंदे
मी तुमच्यातला आहे म्हणून वाढदिवसालाही तुमच्या बरोबर आहे परदेशात नाही
कर्जत – जामखेड मतदारसंघात गेल्या अडीच वर्षांपासून मी मंजूर केलेल्या कामाचे नारळ फोडण्याचे काम सुरू आहे. मी तुमच्यातील आहे त्यामुळे वाढदिवसादिवशी तुमच्या सोबतच आहे. बायका पोरांना घेऊन परदेशात गेलो नाही. असे आमदार प्रा. राम शिंदे यांनी आमदार रोहित पवारांचे नाव न घेता टिका केली.
आमदार प्रा. राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त माजी नगराध्यक्ष सोमनाथ राळेभात, बिबिषन धनवडे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अजय काशीद, शहराध्यक्ष बिबिषन धनवडे, माजी नगराध्यक्ष सोमनाथ राळेभात, नगराध्यक्ष अमित चिंतामणी, पोपट (नाना) राळेभात, प्रविण सानप, भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष शरद कार्ले, डॉ. अल्ताफ शेख, अर्जुन म्हेत्रे, दि. पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे खजिनदार राजेश मोरे, ऋषिकेश मोरे, अभिजीत राळेभात, विठ्ठल राळेभात,मोहन गडदे, साकतचे माजी चेअरमन व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचे स्वीय साहाय्यक प्रा. अरूण वराट, लहू शिंदे, चेअरमन कैलास वराट, माजी सरपंच हरीभाऊ मुरूमकर, प्रा. युवराज मुरूमकर, रमेश वराट, गोरख घनवट, तुषार बोथरा, मनोज कुलकर्णी, सुनील यादव यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार प्रा राम शिंदे म्हणाले की, मी मागच्या दाराने आलो म्हणून विरोधक टिका करतात पण मी आमदार झालो आणी सरकार आले भाजपा ही लोकांच्या मना मनातील व तळागाळातील पार्टी आहे. मंत्री असताना वाढदिवस साजरा झाला त्यापेक्षाही जोरात सध्या वाढदिवस सप्ताह साजरा होत आहे. कारण अडीच वर्षे मतदारसंघातील लोकांनी खुप भोगले आहे. आपण सर्व कार्यकर्त्यांचा मान, स्वाभीमान, आत्मसन्मान जागृत ठेवून काम करू जेणेकरून कार्यकर्त्यांची मान महाराष्ट्रात उंचावली पाहिजे.
मी मंत्री असताना कुठे खड्डा नव्हता आता सगळीकडे खड्डेच खड्डे आहेत. फक्त कोणतेही काम आम्हीच मंजूर केले असे विरोधक सांगतात. पण अडीच वर्षात साधा रस्त्यावरील खड्डा बुजवता आला नाही.
तत्कालीन उपमुख्यमंत्री यांनी शहराची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली हे सांगितले पण मतदारसंघात कुठे पाणी योजना अद्यापही नाही.
गेल्या अडीच वर्षात अधिकारी व कार्यकर्ते यांच्यात भीतीचे व दहशतीचे वातावरण होते या भीतीला संपवून चोख उत्तर देणार आहे. येणाऱ्या निवडणूका हे आमचे लक्ष आहे. त्या काबीज करण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे असे आवाहन केले
आमदार प्रा राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरासह तालुक्यात अनेक ठिकाणी विविध उपक्रम सुरू आहेत.