जामखेड न्युज——
अल्पवयीन मुलांमुलींचे विवाह करणार नाहीत मुलांना शिकवणार मदारी समाजाचा निर्धार
आम्ही बदलतोय तुम्ही पण बदला..ॲड.डॉ.अरुण (आबा) जाधव
आजपर्यंत इनामी इतबारे लहान मोठे कामे करीत कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होतो. समाजात शिक्षणाचे प्रमाण कमी यामुळे लहान वयात मुलांमुलींचे लग्न होत होते. यामुळे अनेक अडीअडचणी चा सामना करावा लागत होता. समाजाला वेळोवेळी मार्गदर्शन व शासनाच्या विविध योजना समाजातील तळागाळापर्यंत पोहचवण्यासाठी अनाथाचे नाथ गोरगरिबांचे कैवारी अँड अरूण जाधव यांनी प्रयत्न केले व आज समाज बदलत आहे. आम्ही लहान वयात मुलांमुलींचे लग्न करणार नाहीत तसेच मुलांना शिक्षण देणार असा निर्धार केला आहे.
दि. 28/12/2022 रोजी खर्डा नगरी येथील मदारी समाजातील दहा वधूवरांनाचा सामूहिक विवाह संविधान प्रतिमेचे पूजन करून सुरू करण्यात आले महाराष्ट्रभर भटकंती करत असणाऱ्या मदारी समाजतील सामूहिक विवाह सोहळास गोरगरिबांच्या कष्टकऱ्यांचे भटके-विमुक्तांचे नेते ॲड.डॉ.अरुण (आबा) जाधव तसेच खर्डा येथील पी आय प्रकाश पाटील उपस्थित होते.
यावेळी बोलताना ॲड.डॉ.अरुण जाधव म्हणाले की महाराष्ट्रामध्ये कोकण,पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या विभागात काच, पत्रा, प्लास्टिक,भंगार गोळा करून तसेच वाहनांना डिझाईन बनवणे मिळणाऱ्या पैश्यातून कुटूबांची व चिल्यापिल्याची उपजिवीका भागवणे असा हा ईमानदार मदारी बांधव छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात विश्वासाने माळवा म्हणून प्रसिद्ध असणारा मदारी मेहतर यांचे वंशज्यांनी आज पासून ठरवले की कमी वयात मुला मुलींचे विवाह करणार नाही प्रत्येकाने मुले शिकवले पाहिजे असे ठरवले .या सामूहिक विवाह सोहळ्यासाठी प्रशाकीय अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते,संविधान प्रचारक विशाल (भाऊ) पवार, तुकाराम पवार,गणपत कराळे,शीतल पवार,दिपाली काळे, प्रमोद गंगावणे, कांतीलाल जाधव, गौरव बागडे, बिलाला मदारी करमाळा, सादिक मदारी टेंभूर्णी,फकीर मदारी बीड, राजू मदारी भिगवन, ईमाम मदारी बार्शी,अमीर मदारी परंडा,महेबुब पाट्स,सुलेमान अकलूज बीड,उस्मानाबाद,सांगली, सोलापूर,अहमदनगर, अकलूज, मंगळवेढा, करमाळा,भूम, बार्शी,परंडा, जामखेड,पाटोदा, पाटस, टेंभूर्णी,पुणे, भिगवन,येथील मदारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता.यावेळी वधूवरांना आशीर्वाद संतोष चव्हाण सर,तुकाराम पवार, डॉ.नागरगोजे,वैजीनाथ लोंढे पाटील दिले सूत्रसंचान विशाल पवार यांनी केले.