जामखेड न्युज——
सरपंच हनुमंत पाटील व ग्रामपंचायत सदस्य कोल्हे यांनी पदरमोड करून तुकाई वस्तीची भागवली तहान
साकत ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या कोल्हेवाडी येथील तुकाई वस्ती येथे पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई होती वस्तीवरील लोकांना अडचणीचा सामना करावा लागत होता हीच अडचण लक्षात घेऊन साकतचे सरपंच हनुमंत पाटील, उपसरपंच बळीराम कोल्हे, सदस्य राजाभाऊ कोल्हे, वाल्मिक कोल्हे यांनी पदरमोड करून तुकाई वस्तीची तहान भागवली आहे.
साकत ग्रामपंचायत अंतर्गत कोल्हेवाडी येथील तुकाई वस्ती आहे येथील लोकसंख्या सुमारे शंभर पेक्षा जास्त आहे. या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई होती हिच अडचण लक्षात घेऊन या वस्तीवर सरपंच हनुमंत पाटील व तीन्ही ग्रामपंचायत सदस्य यांनी पदरमोड करून वस्तीवर बोअरवेल घेतला आणी बोअरवेलला पाणीही चांगले लागले. यामुळे सुमारे शंभर पेक्षा जास्त लोकांची पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे. यावेळी वस्तीवरील लोकांच्या चेहऱ्यांवर आनंद ओसंडून वाहत होता.
पिण्याच्या पाण्याची अडचण ओळखून सरपंच हनुमंत पाटील, उपसरपंच बळीराम कोल्हे, सदस्य
राजाभाऊ कोल्हे, वाल्मीक कोल्हे यांनी पदरमोड करून तुकाई वस्तीची तहान भागवली आहे. याबद्दल ग्रामस्थांनी सरपंच व तिन्ही सदस्य कोल्हे यांचे आभार मानले आहेत.