जामखेड न्युज——
लाठी काठी मुळे फक्त मनगटच नाही तर मणही सक्षम होते – बालविकास अधिकारी ज्योती बेल्हेकर
जामखेड शिवजन्मोत्सव समिती आयोजित मोफत शिवकालीन शस्त्रकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न
लाठी काठी प्रशिक्षण खूपच महत्त्वाचे आहे त्यामुळे फक्त मणगटच नाही तर मण व मेंदू ही सक्षम होतो. कोणाची वाकड्या नजरेने पाहण्याची हिम्मत होत नाही. सध्याच्या काळात आधुनिक शस्त्रास्त्रांचा वापर वाढला असला तरी जगभरात भारतीय प्राचीन युद्धकलेचे महत्त्व सर्वश्रुत आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी जोपासलेल्या शिवकालीन कला आणि शस्त्रविद्येला ऐतिहासिक महत्त्व आहे. भारताच्या या प्राचीन युद्धकलेला जिवंत ठेवत तसेच स्व संरक्षणासाठी तिचा वसा जपण्याचे काम जामखेड मधील शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने करण्यात येत आहे. हे काम खुपच स्तुत्य आहे असे मत महिला व बालविकास अधिकारी ज्योती बेल्हेकर यांनी सांगितले.
महिला आयोजित शिवजन्मोउसत्व समिती जामखेड सौ. रोहिणी संजय काशिद व त्यांच्या सहकारी मिना अविनाश बेलेकर, कांचन प्रकाश दहितोंडे, सोनाली पांडुरंग भोसले यांच्या सहकाऱ्यांनी मोफत शिवकालीन शस्त्रकला प्रशिक्षण शिबिर आयोजन केले होते याचा समारोप प्रसंगी बेल्हेकर बोलत होत्या
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला व बालकल्याण अधिकारी ज्योती बेल्हेकर तर प्रमुख पाहुणे म्हणून
वर्षा संभाजी गायकवाड, मुख्याध्यापिका मीना राळेभात, अँड स्नेहल फुटाणे, सरपंच ऋतूताई काशिद, डॉ. प्रियंका चौरे, डॉ. विद्या काशिद, सौ, तनुजा सुशील पन्हाळकर, सौ, डॉ स्वेताताई शिंदे, सौ. प्रभाताई रासकर, योगिता नीलेश भोसले, श्रद्धा जगताप, साक्षी जाधव, वैशाली शिंदे, दिपाली भोसले, सारिका जमदाडे, ज्योती राऊत, यांच्या सह आयोजक महिला आयोजित शिवजन्मोउसत्व समिती जामखेड सौ. रोहिणी संजय काशिद व त्यांच्या सहकारी मिना अविनाश बेलेकर, कांचन प्रकाश दहितोंडे, सोनाली पांडुरंग भोसले यांनी शिवकालीन शस्त्रकला प्रशिक्षण आयोजित केलेले आहे.
यावेळी बोलताना मुख्याध्यापक मीना राळेभात म्हणाल्या की, मोबाईल ईश्वातुन मुलींना बाहेर काढून लाठी काठी प्रशिक्षण दिले हे महत्त्वाचे आहे. मुली कोठेही मागे नाहीत. प्रत्येकाने मुलींना घरात स्वातंत्र्य दिले पाहिजे.
यावेळी बोलताना सांगितले की, आरती राळेभात म्हणाल्या की, शिवबा घडण्यासाठी आगोदर जिजाऊ घडविली पाहिजे.
यावेळी शिवजन्मोउसत्व समिती आयोजक सौ. रोहिणी संजय काशिद म्हणाल्या की, मुलींना स्व संरक्षणसाठी दरवर्षी शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे.
शिबिरासाठी मोठ्या प्रमाणात मुली व महिलांनी सहभाग घेतला होता.
यात ६ ते ४० वयोगटातील महिला प्रशिक्षणार्थींच्या उत्स्फूर्त सहभाग आहे. दि. १ डिसेंबर ते १५ डिसेंबर पर्यंत लोकमान्य मराठी शाळेत हे प्रशिक्षण आयोजित केले होते.
यात विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या महिलांचनी मार्गदर्शन केले.
प्रशिक्षणादरम्यान येथे युद्धकला, तसेच एखादे शस्त्र शिकवण्याआधी प्रशिक्षकांकडून त्या मागील इतिहास, शस्त्र वापरायचे तंत्र, ते कोणत्या धातूंनी बनवले जाते, इत्यादी शस्त्रासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाते. प्रशिक्षणात सर्वप्रथम सर्व शस्त्रांचे मूळ असणाऱ्या काठीचे प्रशिक्षण दिले जाते. काठीमध्ये पारंगत झाल्यानंतर प्रशिक्षणार्थींना धार नसलेली तलवार, भाला, दांडपट्टा, विटी, माडू, खंजीर लढत, जांबिया लढत, काठी बंदीश, रुमाल बंदिश इत्यादी शस्त्र आणि युद्धकलेतील प्रकार शिकवले
चौकट
प्राचीन युद्धकलेचे प्रशिक्षण घेतल्यामुळे ही कला जपली जातेच, मात्र त्यासोबतच शस्त्र शिकल्याने कोणत्याही परिस्थितीत स्वतःवर संयम राखण्यासाठी देखील याचा फायदा होतो. शस्त्र शिकल्यामुळे आपल्यातील ताकदीविषयी जाण येऊन ती कुठे आणि कशा प्रकारे वापरायची हे समजायला मदत होते. तसेच प्राचीन युद्धकलेत पारंगत झाल्यामुळे आत्मविश्वास वाढून यामुळे महिला सशक्तीकरणालाही बळ मिळते. मुलींना स्व संरक्षणसाठी दरवर्षी शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे.
शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशिद