जामखेड न्युज——
अश्विनी सागर कोल्हे राजुरीच्या सरपंच पदी भरघोस मतांनी विजयी
सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे मित्रमंडळाच्या वतीने सत्कार
जामखेड तालुक्यातील सर्वांचे लक्ष लागुन राहीलेल्या राजुरी ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सौ आश्विनीताई सागर कोल्हे या भरघोस मतांनी निवडून आल्या आहेत .मात्र या निवडणुकीत विद्यमान सरपंच गणेश कोल्हे यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. विजयी उमेदवारांचा सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे मित्रमंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
राजुरी ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदासाठी भाजपकडून माजी सरपंच सुभाष तात्या काळदाते यांच्या सौभाग्यवती वैशालीताई काळदाते तर राष्ट्रवादी काँग्रेस कडुन सागर कोल्हे यांच्या पत्नी सौ अश्विनीताई कोल्हे यांच्या मध्ये लढत झाली होती .या लढतीत सौ वैशालीताई काळदाते यांना पराभवाचा सामना करावा लागला. भाजपच्या पराभुत उमेदवार यांना 794 मते पडली तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सौ आश्विनीताई सागर कोल्हे यांना 894 मते मिळाली आसल्याने विजयी झाल्या आहेत.
राजुरी मध्ये नऊ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला चार जागा मिळाल्या तर भाजपला पाच जागा मिळविता आल्या आहेत. राजुरी ग्रामपंचायतीच्या प्रभाग तीन मधील सर्वसाधारण जागेवरच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. कारण या ठिकाणी गौतम आश्राजी फुंदे आणि मच्छिंद्र आश्रुबा फुंदे या दोन्ही उमेदवारांना समसमान 282 मते मिळाली होती .यावेळी तहसीलदार योगेश चंद्रे यांच्या उपस्थितीत चिठ्ठीचा कौल घेण्यात आला. श्रेया विजय भोरे या चिमुकल्या मुलीच्या हस्ते चिठ्ठी काढण्यात आली. यामध्ये गौतम फुंदे हे विजयी ठरली. फुंदे यांच्या विजयावर शिक्कामोर्तब होताच राजुरीत भाजपला सदस्यपदात बहुमत मिळाले.
राजुरी ग्रामपंचायत मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सरपंच पदाचे उमेदवार अश्विनीताई सागर कोल्हे तर ग्रामपंचायत सदस्य पदी राष्ट्रवादी काँग्रेसचे सोशल मिडीया प्रमुख काकासाहेब कोल्हे यांच्या मातोश्री सुनिता मुकिंदा कोल्हे, मीनाक्षी संजय खाडे, किर्ती नानासाहेब खाडे, बाबासाहेब रामदास घुले असे सरपंच पदासह पाच जण विजयी झाले आहेत. तर भाजपकडुन ग्रामपंचायत सदस्य पदासाठी विशाल अशोक चव्हाण, संगिता बाळू मोरे, सुरज सुनिल गायकवाड, संगिता शिवदास कोल्हे, गौतम आश्राजी फुंदे हे पाच जण विजयी झाले आहेत.
विजयानंतर सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे यांनी विजयी उमेदवारांचा सत्कार केला.