ऊस वाहतूक ट्रॅक्टरच्या विना रिफलेक्टर मुळे रयत सेवक बाबुराव भोसले यांचे अपघाती निधन

0
260
  • जामखेड न्युज——

  • ऊस वाहतूक ट्रॅक्टरच्या विना रिफलेक्टर मुळे रयत सेवक बाबुराव भोसले यांचे अपघाती निधन

  • जामखेड तालुक्यातील खांडवी येथील रहिवासी व रयत शिक्षण संस्थेच्या अरणेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शिपाई असलेले बाबु भोसले यांचा जामखेड- करमाळा रोडवरील झिक्री जवळ असलेल्या लोकसेवा मंगल कार्यालयाजवळ ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या विना रिफलेक्टर मुळे झालेल्या अपघातात ते जागीच ठार झाले असून त्यांच्या पत्नीही गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर जामखेड शहरातीलच एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

  • बाबू भोसले हे आपल्या खांडवी गावाहून जामखेडकडे येत असताना पुढे चाललेला ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर लक्षात न आल्याने बाबू भोसले यांच्या मोटारसायकलची सदर ट्रॅक्टरला धडक बसून हा अपघात झाला. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला तर पत्नी गंभीर जखमी झाल्या आहेत. मयत बाबू भोसले त्यांचा मृतदेहावर जामखेड येथिल ग्रामीण रुग्णालयात डॉ. युवराज खराडे यांनी शवविच्छेदन केले.

  • मयत बाबू भोसले हे खांडवी येथील रहिवासी तर अरणगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री अरण्येश्वर विद्यालयात शिपाई होते. त्यांचा स्वभाव मनमिळाऊ असल्याने व त्यांच्यासेवेचा मोठा कालावधी जामखेड तालुक्यातच गेल्याने अनेक लोकांशी त्यांचा जवळून परिचय होता. त्यांच्या मृत्यूमुळे खांडवी परिसरात शोककळा पसरली असून तालुक्यातील सर्व परिचीतांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे.

  • रयत सेवक बाबुराव उत्तम भोसले यांचा अंत्यविधी आज दि. २० डिसेंबर २०२२ रोजी सकाळी १०:३० वाजता खांडवी ता. जामखेड येथे होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here