Wednesday, February 11, 2026
Home ताज्या बातम्या शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त श्री नागेश विद्यालयात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे...

शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त श्री नागेश विद्यालयात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण संपन्न. नॅशनल गोल्ड मेडल प्राप्त आदित्य जायभयचा विद्यालयाच्या वतीने सन्मान.

0
201

जामखेड न्युज——

शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त श्री नागेश विद्यालयात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण संपन्न.

नॅशनल गोल्ड मेडल प्राप्त आदित्य जायभयचा विद्यालयाच्या वतीने सन्मान.

 

रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषिमंत्री पद्मविभूषण खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश विद्यालय मध्ये दि ६ ते ११ डिसेंबर या कालावधीत विविध स्पर्धा घेण्यात आल्या.

या बक्षीस वितरण समारंभाचे कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अशोक यादव, प्रमुख उपस्थिती प्राचार्य मडके बी के ,उपप्राचार्य तांबे पी ए ,पर्यवेक्षक कोकाटे व्ही के , माजी सैनिक संघटना अध्यक्ष बजरंग डोके, नागरगोजे एम एन, अँड.अजिनाथ जायभाय, अँड. वारे, जनता टेलरचे संचालक मुक्तार सय्यद, ज्यूनियर विभाग प्रमुख विनोद सासवडकर, गुरुकुल प्रमुख संतोष ससाने, रमेश बोलभट, रघुनाथ मोहोळकर, साळुंखे बी एस, कोकाटे पी ए, एनसीसी प्रमुख मयूर भोसले, ज्ञानेश्वर लटपटे, संतोष पवार, संभाजी इंगळे,आंधळे मॅडम, पालकर मॅडम. आदी मान्यवर उपस्थित होते.

नॅशनल लेव्हलवर जम्मू येथे झालेल्या सांबू स्पर्धेत आदित्य जायभय याने नॅशनल गोल्ड मेडल मिळाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते फेटा बांधून मेडल व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. व त्याचे वडील एडवोकेट अजिनाथ जायभाय यांचा विद्यालयाच्या वतीने सन्मान करण्यात आला.

तसेच विद्यालयामध्ये पद्मविभूषण खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त निबंध स्पर्धा ,चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, क्रीडा महोत्सव मध्ये कबड्डी, हॉलीबॉल ,खो खो , मैदानी स्पर्धा,धावणे , स्लो सायकल, थैला रेस, या स्पर्धा घेण्यात आल्या.
या सर्व स्पर्धांचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यालयांमध्ये वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी अजिंक्य कोल्हे, गणेश इंगळे या विद्यार्थ्यांनी पवार साहेब यांच्या बद्दल मनोगत व्यक्त केले.
प्रा विनोद सासवडकर, शिवाजीराव ढाळे सर ,एडवोकेट नागरगोजे यांनी पवार साहेबांच्या कार्यांची माहिती दिली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोक यादव यांनी पवार साहेब यांचे सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, समाजाचा कार्याची माहिती दिली. पवार साहेबांचे कार्य सूर्याप्रमाणे तेजस्वी आहे असे मनोगत व्यक्त केले व सर्वांच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
प्रास्ताविक प्राचार्य मडके बी के , कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संभाजी इंगळे तर आभार प्रदर्शन पवार यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!