जामखेड न्युज——
हजारो ग्रामस्थांच्या उपस्थितीत राजुरी येथे जय श्रीराम ग्रामविकास पॅनलच्या प्रचाराचा धुमधडाक्यात शुभारंभ
गर्दीचा उच्चांक पाहता निवडणुकी आगोदरच विरोधकांना धडकी
तालुक्यातील राजुरी ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी जय श्रीराम ग्रामविकास पॅनलच्या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ मोठ्या गर्दीत भव्य रँलीद्वारे धुमधडाक्यात संपन्न झाला एवढी मोठी गर्दी पाहता विरोधकांना निवडणुकी आगोदरच धडकी भरली आहे.
यावेळी बोलताना ग्रामस्थ म्हणाले की, सरपंच पदाचे उमेदवार अश्विनी कोल्हे यांचे पती सागर कोल्हे हे गेल्या दोन वर्षापासून गावातील विकास कामे-मंदिराला कलर देणे, गावात स्टेट लाईट, मुरमीकरण, विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटपासह विविध विकास कामे सुरू आहेत. कोणतेही पद नसताना एवढे कामे करत असतील तर पद मिळाल्यावर आणखी जोमाने कामे करतील असा विश्वास व्यक्त केला.
आजची प्रचार शुभारंभाची रँली पाहता निकाल काय लागणार आहे याचा अंदाज सर्वच ग्रामस्थांना आलेला आहे. ही निवडणूक कोणाची जीरवाजीरवी किंवा कोणाला हरवण्यासाठी नसुन आम्ही विकासाच्या कामावरच जिंकणार आहोत यानंतर माजी सरपंच गणेश कोल्हे यांनी केलेल्या विकास कामे सांगितले. या रॅलीत हजारोंच्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित राहिल्याबद्दल सागर कोल्हे यांनी सर्वांचे आभार मानले.
जामखेड तालुक्यातील राजुरी येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने
जय श्रीराम ग्राम विकास पॅनलच्या उमेदवारांच्या प्रचाराच्या शुभारंभ आज शनिवार दि १० रोजी सामाजिक कार्यकर्ते सागर भाऊ कोल्हे यांच्या विनंतीला मान देऊन हजारो ग्रामस्थांच्या उपस्थितीत संपन्न झाली. या रॅली मध्ये हजारो ग्रामस्थ सहभागी झाले होते. आजच्या रॅलीने विरोधकांच्या मनात धडकी भरली आहे.
राजुरी ग्रामपंचायत २०२२ ची रणधुमाळी सध्या सुरू आहे. आज शनिवार दि १० रोजी राजुरी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत उभ्या करण्यात आलेल्या जय श्रीराम ग्राम विकास पॅनल च्या प्रचाराचा शुभारंभ नुकताच हजारो ग्रामस्थांच्या उपस्थितीत संपन्न झाला. सदर रॅली ची सुरवात सागर कोल्हे यांच्या प्रचार कार्यालयाच्या समोरुन वाजत गाजत काढण्यात आली. या वेळी गावातुन प्राचार फेरी काढण्यात आली. रॅली ग्रामपंचायत कार्यालयाला समोर आली आसता या ठीकाणी श्रीराम मंदिर, रेणुकामाता मंदिर, पिरबाबा, यांचे दर्शन घेऊन महामानव डॉ बाबासाहेब अंबेकर यांना अभिवादन करण्यात आले. या रॅली मध्ये राजुरी, डोळेवाडी, एकबुर्जी व बांगरवस्ती येथील हजारो ग्रामस्थ उपस्थित होते.