जामखेड न्युज——
भीमसैनिकांच्या वतीने बेताल वक्तव्य करणाऱ्या चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन
जामखेड शहरातील खर्डा चौक येथे काल दि. ९ डिसेंबर रोजी समस्त भिमसैनिक जामखेड तालुक्याच्या वतीने भाजपाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिक्षणाचे जनक महात्मा जोतीराव फुले, शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव पाटील व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केले. त्या निषेधार्थ समस्त भिमसैनिक जामखेड तालुक्याच्या वतीने चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिमेला जोडे मारून तसेच घोषणा देत निषेध करण्यात आला.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते विकीभाऊ सदाफुले, बापूसाहेब गायकवाड, जमीर सय्यद, राजन समिंदर, दिपक घायतडक, सचिन सदाफुले, अतिश पारवे यांनी निषेध व्यक्त केले. या निषेध साठी मुस्लिम समाज व माळी समाज यांच्या वतीने पाठिंबा देण्यात आला. यावेळी पोलीस उपनिरीक्षक मा.कन्हेरे साहेब यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनावर सामाजीक कार्यकर्ते विकीभाऊ सदाफुले भिमटोला ग्रृप बापूसाहेब गायकवाड, माजी नगराध्यक्ष निखिल घायतडक, राजन समिंदर, राजेंद्र सदाफुले, रवि सोनवणे, सचिन सदाफुले, संदेश घायतडक, विनोद सोनवणे, प्रमोद सदाफुले, दिपक घायतडक, सचिन सदाफुले, सुर्यकांत सदाफुले यांच्या सह्या आहेत.
यावेळी वंचितचे तालुकाध्यक्ष अतिश पारवे, आरपीआयचे बाबा सोनवणे, जमीर सय्यद, सोमनाथ राऊत, मुकुंद घायतडक, सुर्यकांत सदाफुले, विनोद घायतडक, दिपक सदाफुले, विकीभाई गायकवाड, मनीष घायतडक, प्रतिक निकाळजे, अमोल गव्हाळे आदींसह शेकडो भिमसैनिक उपस्थित होते.