जामखेड न्युज——
घरे नसणाऱ्या लोकांनी घरकुल योजनेत हिरीरीने सहभाग घ्यावा – गटविकास अधिकारी प्रकाश पोळ

शासनाने २०२४ पर्यंत सर्वासाठी घरे हे शासनाचे धोरण आहे. घरे नसणाऱ्या लोकांनी घरकुल योजनेत हिरीरीने सहभाग घ्यावा आणी यादीत नाव आल्यानंतर नव्वद दिवसात घरे पुर्ण करावेत असे आवाहन गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी केले.

साकत येथे घरकुल मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, सरपंच हनुमंत पाटील, उपसरपंच राजाभाऊ वराट, कृषी अधिकारी अशोक शेळके, विस्तार अधिकारी बापुराव माने, एस. व्ही मिसाळ, सिद्धनाथ भजनावळे, गृहनिर्माण अभियंता सुजित पवार ग्रामपंचायत सदस्य महादेव वराट, ग्रामविकास अधिकारी राजेंद्र वळेकर, रोजगार सेवक हरीभाऊ वराट, रामहरी वराट, सतिश लहाने यांच्या सह अनेक लाभार्थी उपस्थित होते.
साकत ग्रामपंचायत मध्ये १७७ घरकुले अपुर्ण आहेत. मंजुरी मिळाल्यानंतर नव्वद दिवसात पूर्ण करावे लागणार आहेत यासाठी गटविकास अधिकारी यांनी लाभार्थी यांना मार्गदर्शन केले घरकुल महत्त्वाची योजना यात आपण हिरिरीने भाग घ्यावा
घरकुल महत्त्वाची योजना यात आपण हिरिरीने भाग घ्यावा असे आवाहन लाभार्थ्यांना केले. यादीत नाव आल्यावर नव्वद दिवसात घरकुल पुर्ण करावे असेही सांगितले.

प्रधानमंत्री आवास योजना राज्य सरकारच्या योजनेतंर्गत नव्वद दिवसात घरकुल पुर्ण करणेबाबत लाभार्थाने करावयाचा करारनामा याबाबत गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी सविस्तर माहिती दिली.
९० दिवसात घरकुल पूर्ण करणे बाबतच्या अटी व शर्ती
१. घरकुल बांधकामासाठी माझे स्वतःचे मालकीची जागा मी वापरत आहे. घरकुल बांधकामाची जागा निर्विवाद असून घरकुल
सुरू केल्यानंतर कोणताही वाद-विवाद उद्भवल्यास मी स्वतः स्वतःच्या खर्चाने त्याचा निपटारा करीन.
२. बांधकामाच्या कोणत्याही टप्प्यावर अनुदान वितरित झाल्यानंतर वादविवाद उद्भवल्यास माझे घरकुल रद्द केले जाण्यास
माझी कोणतीही हरकत राहणार नाही. वादविवाद उद्भवल्यास मी घरकुल अनुदान म्हणून घेतलेली सर्व रक्कम परत
करण्यास बांधील राहील.
३. मंजूर घरकुल मी अनुदान व हप्त्याची वाट न पाहता ९० दिवसात किमान २७० चौरस फूट बांधकाम पूर्ण करीन.
४. मंजूर घरकुल बांधकाम पूर्ण करण्यासाठी माझ्याकडून विलंब झाल्यास नियमाप्रमाणे मला दंड किंवा अनुदान एकरकमी परत
करणे किंवा अन्य कोणतीही शिक्षा मला मान्य राहील.
५. विलंब झाल्यास माझेविरुद्ध जामखेड न्यायालय येथे लोक न्यायालयात दावा दाखल करण्यास माझी कोणतीही हरकत
राहणार नाही. विलंब झाल्यास लोक न्यायालयाच्या सुलेनामाप्रमाणे मी कारवाईस पात्र राहील किंवा लोकन्यायालयाने
शिक्षा दिल्यास त्याप्रमाणे वागेल.
६. वरील अटी व शर्ती मला पूर्ण समजल्या असून मला त्या मान्य आहेत वरील अटी व शर्तीचा भंग झाल्यास
भा.द.वि.का. कलम १९९/२०० नुसार शिक्षेस पात्र राहील.
वरीलप्रमाणे करारनामा मी पूर्ण शुद्धीत व स्वयंखुशीने लिहून दिला.
अशा प्रकारचे करारनामा याबाबत माहिती दिली.