जामखेड न्युज——
बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार
अकोले तालुक्यातील राजूर परिसरातील कोकणेवाडी शिवारात आज पहाटे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. राजूर वनविभागाने पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदन अकोले येथे पाठवण्यात आला होता.
धरणग्रस्त आदिवासी महिला तुळसाबाई/ रत्नाबाई तुकाराम खडके वय ६५, निळवंडे गावच्या कोकणेवाडी शिवारात, सर्वे नंबर ३४ मध्ये प्रकल्पग्रस्त म्हणून जमीन मिळाली आहे येथे जंगलात वस्ती त्यांची आहे.
पहाटे चार वाजता बिबट्याने हल्लाकरत बकरू ठार केले. नंतर वयोवृद्ध महिलेवर हल्लाकरून तीस जंगलात ४०० फुटांवर ओढत नेले. वृध्देच्या मानेवर जखम असून एक पाय व छातीचाभाग खाल्ला आहे.या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
निळवंडे गावात चार दिवसांपुर्वी मध्य वस्तीत राञी साडे नऊ च्या बिबट्या घुसला होता. बिबट्याने हल्ला करून सत्यवान गायकवाड याच्या ओट्यावरून मांजर नेली. या ओट्यावर मांजरी शेजारीच छोटा मुलगा होता. तो बचावला, गायकवाड यांनी आरडाओरड केल्यावर बिबट्या पसार झाला. बिबट्याची दहशत निळवंडे कोकणेवाडी निंब्रळ परिसरात असून नागरीक भयभीत झाले आहेत.