जामखेड न्युज——
गावच्या शाळेतील सन्मान महत्त्वाचा – संजय वराट
संजय वराट यांची मुख्याध्यापकपदी निवड झाल्याबद्दल श्री साकेश्वर विद्यालयाच्या वतीने सन्मान
आपल्या गावात व शाळेत झालेला सन्मान हा महत्त्वाचा आहे. यामुळे जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळेल. सध्या ज्ञानाच्या कक्षा अधिक विस्तारत आहेत. आपणही जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या बळावर नवनवीन शिखरे पादाक्रांत करावेत असे आवाहन विद्यार्थ्यांना केले.
संजय वराट सरांची जिजामाता माध्यमिक हायस्कूल देवदैठण च्या मुख्याध्यापक पदी निवड झाल्याबद्दल तसेच विद्यालयातील शिष्यवृत्ती साठी पात्र ठरलेल्या सार्थक मुरूमकर, सिद्धी मुरूमकर व सार्थक चव्हाण यांना तसेच सेवा संस्थेच्या स्विकृत संचालक पदी निवड झाल्याबद्दल हरीभाऊ मुरूमकर तसेच शहादेव वराट यांचा विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक दत्तात्रय काळे, तर प्रमुख पाहुणे म्हणून खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचे स्वीय साहाय्यक व माजी चेअरमन प्रा. अरूण वराट, चेअरमन कैलास वराट, उपसरपंच राजाभाऊ वराट, माजी सरपंच कांतीलाल वराट, ग्रामपंचायत सदस्य महादेव वराट, विठ्ठल वराट, प्रगतशील शेतकरी अविन लहाने, राजाभाऊ वराट, पत्रकार बाळासाहेब वराट, आश्रु सरोदे, विद्यालयाचे शिक्षक राजकुमार थोरवे, सुदाम वराट, अर्जुन रासकर, अशोक घोलप, त्रिंबक लोळगे, सचिन वराट, अतुल दळवी यांच्या सह सर्व कर्मचारी व विद्यार्थी हजर होते.
यावेळी बोलताना संजय वराट म्हणाले की, कठोर परिश्रम घेतल्याशिवाय यश मिळत नाही. विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त अभ्यास करून आपले आपल्या शाळेचे व गावाचे नाव लौकिक करावे असेही सांगितले.
यावेळी माजी सरपंच कांतीलाल वराट यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त अभ्यास करून मोठे यश संपादन करावे.
चेअरमन कैलास वराट यांनी सांगितले की, शाळेच्या जडणघडणीसाठी शाळेला मदत करण्यासाठी आम्ही ग्रामस्थ सदैव तयार आहोत. असेही सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष दत्तात्रय काळे, संजय वराट यांनी समाजकारण व राजकारणात जसा आदर्श ठसा उमटवला आहे तसाच मुख्याध्यापक म्हणूनही आपल्या कामाचा ठसा उमठवतील अशी आशा व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुदाम वराट यांनी तर आभार राजकुमार थोरवे यांनी मानले.