जामखेड न्युज——
सकल मराठा समाजाच्या वतीने जामखेड येथे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन
महाराष्ट्र द्रोही राज्यपालावर कारवाई करावी अन्यथा सकल मराठा समाज तीव्र आंदोलन करणार -मंगेश आजबे
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल आज सोमवार दि. २१ रोजी जामखेड शहरातील खर्डा चौक येथे सकाळी ११ .०० वाजता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या प्रतिमेला जोडे मारुन जाहीर निषेध करण्यात आला.
यावेळी मंगेश आजबे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचे दैवत आहेत. भगतसिंग कोश्यरी हे जाणीव पूर्वक वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान करतात. हे तमाम शिवप्रेमी सहन करणार नाहीत. तसेच राज्यपाल हे जाणीवपूर्वक आमच्या महापूरुषांचा अपमान करत आहेत.यापुर्वीही त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतीबा फुले, सावित्रीमाई फुले व अन्य महापुरुषाबद्दल व महाराष्ट्राबद्ल चुकीचे विधाने केली आहेत. यावरुन हे स्पष्ट होत आहे की, राज्यपाल कोश्यरी हे महाराष्ट्र द्रोही आहेत.अशा व्यक्तिला महाराष्ट्राच्या सर्वेच्च पदी राहण्याचा अधिकार नाही.
त्यामुळे सरकारने त्यांना ताबडतोब राज्यपाल पदावरुन पायउतार करावे. अन्यथा सकल मराठा समाज महाराष्ट्रभर रस्त्यावर उतरुन तीव्र स्वरुपाचे आंदोलन करणार आहे. असा इशारा सकल मराठा समाजाचे जामखेड तालुका समन्वयक मंगेश आजबे यांनी दिला आहे.
पवन राळेभात म्हणाले, बेताल वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोश्यरी यांना सकल मराठा समाज त्यांना त्यांची जागा दाखवून दिल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही.
याप्रसंगी सकल मराठा समन्वयक मंगेश आजबे, बावी सोसायटीचे चेअरमन सुंदरदास बिरंगळ, कुंडल राळेभात, पवन राळेभात, अँड ऋषीकेश डूचे, सुनिल जगताप, अण्णा ढवळे, दादाराजे भोसले, बाळासाहेब ठाकरे, दत्ता साळुंखे, अक्षय सुळ, उमेश मुळे, अशोक वाघ, रोहित कार्ले,अशोक नेटके, बालु आजबे, गणेश जगताप, अशोक जगदाळे, बालु मुळे, स्वप्नील शेळके, ऋषीकेश भोसले, मंगेश मुळे, शिवनाथ अनपट, बाबू साळुंके, पांडुरंग कदम, प्रदीप वाळूंजकर आदी सकल मराठा समाजाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.