जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
कोरोना रूग्णांवर औषधोपचारासह चहा नाष्टा व दोन वेळच्या जेवणाची मोफत सोय करणार्या आरोळे कोविड सेंटरला जामखेड नगरपरिषदेचे कर्तव्यदक्ष नगरसेवक अमित चिंतामणी यांनी वाढदिवसानिमित्त कोविड सेंटरला आॅक्सिजन सिलेंडरची मदत केली आहे. यामुळे परिसरातील कोवीड वर उपचार घेणार्या रूग्णांना याचा फायदा होणार आहे. यावेळी त्यांचा मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.

नुकतेच माजी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी कोविड सेंटरला भेट देत रूग्णांची विचारपूस करत कोविड सेंटरच्या अडीअडचणी जाणून घेतल्या व त्याबाबत जिल्हाधिकारी यांच्या कडे अडचणी मांडल्या जिल्हाधिकारी यांनीही ताबडतोब आरोळे कोविड सेंटरला आॅक्सिजन सिलेंडर व वीजेसाठी जनरेटरला लागणार्या खर्चाला मंजुरी दिली यामुळे परिसरातील रुग्णांना याचा फायदा होणार आहे.
गेल्या वर्षभरात आरोळे कोविड सेंटर मधुन सुमारे चार हजार कोरोना पेशंट बरे होऊन घरी गेलेले आहेत. त्यांची औषधोपचारासह चहा नाष्टा व दोन वेळच्या जेवणाची मोफत सोय आरोळे कोविड सेंटरचे संचालक डॉ रवी आरोळे व डॉ शोभा आरोळे यांनी केली आहे. आजही येथे तिनशेपेक्षा जास्त कोरोना बाधित रुग्ण उपचार घेत आहेत. पन्नास पेक्षा जास्त रुग्णांना आॅक्सिजन वर आहेत. सध्या हे कोविड सेंटर आर्थिक अडचणीत असल्याने अनेक दानशूर व्यक्ती मदत करत आहेत. माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांची नुकतीच आरोळे कोविड सेंटरला भेट दिली व रूग्णांना भेटून अडीअडचणी जाणून घेतल्या व जिल्हाधिकारी डॉ राजेन्द्र भोसले यांची भेट घेऊन अडीअडचणी सांगितल्या जिल्हाधिकारी यांनीही ताबडतोब आॅक्सिजन सिलेंडर व जनरेटरचा खर्च मंजूर करत मोठा दिलासा दिला आहे. माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या मुळे परिसरातील गोरगरीब रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. अशी माहिती जामखेड नगरपरिषदेचे नगरसेवक अमित चिंतामणी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.