जामखेड प्रतिनिधीअवैद्य वाळू वाहतूक करणाऱ्या तीन वाहनांवर जामखेड पोलीसांची धडक कारवाई पंचेचाळीस लाख रुपयांची तीन वाहने व सत्तर लाख रुपयांची चौदा ब्रास वाळू जप्त करत तीनही चालकाविरुद्ध गौण खनिज अधिनियमन नुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याने अवैध वाळू तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.गुप्त माहिती मिळाल्यानुसार जामखेड पोलीसांनीजामखेड अरणगाव रस्त्यावर सापळा रचून अवैध वाळू वाहतूक करणारे दोन ट्रक व एक हायवा ट्रक अशी 14 ब्रास वाळू जप्त करून तीनही चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी पदभार स्वीकारल्यापासून अवैध धंद्यावर धाड सत्र सुरू केलेले आहे यामुळे जनतेत समाधान व्यक्त केले जात आहे तर अवैध धंदे वाल्यांचे धाबे दणाणले आहेत.दि. २७ रोजी पहाटे पोलीस कॉन्स्टेबल संदिप राऊत हे गुड मॉर्निंग चेकिंग करत आसताना राजेंद्र नर्सरी अरणगाव जवळ एक ट्रक जोराने येताना दिसली संशय आल्यानेट्रक क्रमांक एम एच 14 ए. एच. 6769 पाठलाग करून चौकशी केली असता ट्रक मध्ये चार ब्रास वाळू वीस हजार रुपयांची तर दहा लाख रुपयांची गाडी ताब्यात घेऊन ट्रक चालक रामहारी रमेश डोके रा. भुतवडा ता. जामखेड यांच्या विरोधात पोलीस कॉन्स्टेबल संदिप राऊत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गौण खनिज अधिनियमन कलम 21 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुप्त बातमी दाराकडून मिळालेल्या बातमी नुसार अरणगाव जामखेड रस्त्यावर पाटोदा शिवारात वाळूने भरलेला हायवा ट्रक एम एच 16 सीसी 5769 येताना दिसला चौकशी केली असता विना परवाना चोरटी वाळू वाहतूक आढळली गाडी किंमत 25 लाख व सहा ब्रास वाळू तीस हजार रुपये, पोलीस कॉन्स्टेबल संग्राम जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चालक परमेश्वर पांडुरंग पठाडे रा. आष्टी जि. बीड यांच्या विरोधात गौण खनिज अधिनियमन नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अरणगाव जामखेड रस्त्यावर एस्सार पेट्रोल पंपासमोर एम एच 16 क्यू 1011 गाडीत वाळू दिसली चौकशी केली असता परवाना नव्हता गाडीत चार ब्रास वाळू वीस हजार रुपये व गाडी किंमत दहा लाख रुपयांचीतेव्हा पोलिस कॉन्स्टेबल संग्राम जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चालक अरविंद रघुनाथ पवार रा. शितपुर ता. कर्जत यांच्या विरोधात भादवी 379 गौण खनिज अधिनियमन कलम 21 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तिन्ही कारवाईत 45 लाख रुपयांची दोन ट्रक व एक हायवा यात 14 ब्रास वाळू 70 हजार रुपये तिन्ही वाहने वाळू सह जप्त करत तिन्ही चालकाविरुद्ध जामखेड पोलिस स्टेशनला गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक, आण्णासाहेब जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक महेश जानकर हेड पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी बोस, संजय लाटे, संग्राम जाधव, पोलीस कॉन्स्टेबल अविनाश ढेरे, आबा आवारे यांनी केली आहे. तालुक्यात मोठय़ा प्रमाणावर अवैध धंदे वाढले होते. चोरटी वाळू वाहतूक, अवैध हत्यारे, खाजगी सावकारकी, झुगार, मटका, अवैध दारू विक्री फोफावली होती पण नव्याने हजर झालेल्या पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी अवैध धंद्यावर धाड सत्र सुरू केल्याने अवैध धंदे करणार्यांचे धाबे दणाणले आहेत. तर सर्व सामान्य जनतेतून समाधान व्यक्त केले जात आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल शिवाजी भोस करत आहेत.
Home ताज्या बातम्या जामखेड पोलीसांची अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई सत्तर हजार रुपये किमती...