जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
नुकत्याच झालेल्या सरपंच पदाच्या निवडणुकीत गुरेवाडी – महारुळीच्या सरपंच पदी अंजली लक्ष्मण ढेपे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल आज ग्रामस्थांच्या वतीने सरपंच व उपसरपंच यांचा नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता त्यावेळी सरपंच ढेपे यांनी स्वच्छ गाव, सुंदर गाव व हरित गाव करण्यासाठी प्रत्येक कुटुंबाला घराच्या दारात लावण्यासाठी एक फळझाड देण्यात येईल त्या कुटुंबाने त्या झाडांची काळजी घ्यावी दोन वर्षांत झाडांना फळे येतील त्यामुळे कुटुंबियांना फळे मिळतील व गाव हरित होईल.

सरपंच अंजली लक्ष्मण ढेपे व उपसरपंच छबुराव राजाभाऊ कोरडे यांचा आज ग्रामस्थांच्या वतीने नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता यावेळी प्रा. लक्ष्मण ढेपे (सर), महादेव ढेपे, माजी सरपंच कंपाताई मोहळकर, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश मुळे, माजी सरपंच अशोक ढेपे, सुनिल मोहळकर, आण्णा चव्हाण, सतिश ढेपे, रणजित ढेपे, प्रकाश ढेपे, विकास जगदाळे, शहाजी मोहळकर, उद्धव मोहळकर, उर्मिला ढेपे, जयश्री ढेपे, वैशाली ढेपे, शशिकला ढेपे, सुनिल ढेपे, काकासाहेब मुळे, चंद्रकांत ढेपे, केशव ढेपे, महादेव ढेपे, गोकुळ ढेपे, सावता ढेपे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी जामखेड न्युजशी बोलताना सरपंच ढेपे म्हणाल्या की, येत्या काही वर्षांत आमदार रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वाच्या सहकार्याने गुरेवाडी – महारुळी ग्रामपंचायत विकासाच्या बाबतीत एक माॅडेल ग्रामपंचायत बनविणार आहोत हरित गाव करण्यासाठी प्रत्येक कुटुंबाला आंबा किंवा नारळाचे झाड देणार आहे.

जवळपास साडेपाचशे कुटुंब आहेत सर्वाना एक झाड देण्यात येणार आहे. गावही हरित होईल व कुटुंबीयांना फळेही मिळतील तसेच जमिनीतील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी ओढा नदी खोलीकरण करण्यात येईल व गावातील पाणंद रस्ते मार्गी लावण्यात येतील