जामखेड न्युज——
राष्ट्रीय फ्लोअरबाॅल स्पर्धेत आंचल चिंतामणीस सुवर्णपदक
जामखेड शहरात भव्य दिव्य मिरवणूक
जामखेडच्या शिरपेचात मानाचा तुरा

इंटरनॅशनल फ्लोअरबाॅल फेडरेशन (IFF) अंतर्गत असलेल्या तामिळनाडू फ्लोअरबाॅल असोसिएशनच्या वतीने चेन्नई येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय फ्लोअरबाॅल स्पर्धेत कु. आंचल अमित चिंतामणी या जामखेडच्या सुकन्येने सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे. या गौरवास्पद कामगिरीमुळे तिच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षांव होत आहे. तिची आज शहरात भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली होती.

राष्ट्रीय फ्लोअरबाॅल स्पर्धेत आंचल अमित चिंतामणीस सुवर्णपदक मिळाल्यामुळे जामखेडच्या
शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

तिच्या यशाबद्दल अमित चिंतामणी मित्रमंडळाच्या वतीने जामखेड शहरात भव्य दिव्य फटाक्यांची आतषबाजी करत ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली होती.

यावेळी आंचलचे आजोबा दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष अरूणशेठ चिंतामणी, वडिल नगरसेवक अमित चिंतामणी, आई सौ. प्राजंल चिंतामणी, आजी अंजली अरूण चिंतामणी, विलासशेठ चिंतामणी, कमल विलास चिंतामणी, मिनाक्षी, किसनशेठ चिंतामणी, राजश्री चिंतामणी, प्रकाशशेठ दहिवाळकर, सुमित खांडवीकर, प्रशांत राऊत, योगेश राऊत, नितीन डाडर, विठ्ठल रेडे, नानासाहेब बांगर,विठ्ठल परांडकर, नितीन जगताप, महेश शिंदे, प्रल्हाद साळुंके सर, विलास हरणे, प्रतिक उदारे, अँड प्रविण सानप, केदार रसाळ, सचिन मासाळ, गणेश काळे, सागर लोहकरे, संतोष रूळसमुद्र, सागर कुलथे, मतिन आतार, फिरोज कुरेशी, योगेश अब्दुले, गिरीश काथवटे, उद्धव हुलगंडे, राजू गवळी यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कु. आंचल चिंतामणी ही जामखेड नगरपरिषदचे कार्यकुशल नगरसेवक अमित चिंतामणी यांची कन्या आहे. नगरसेवक अमित चिंतामणी यांनी आपल्या सामाजिक, सांस्कृतिक व विकासात्मक कार्यामुळे जामखेडमध्ये जरी नाव कमावले असले तरी त्यांच्या कन्येने फ्लोअरबाॅल सारख्या खेळात राष्ट्रीयस्तरावर सुवर्णपदक मिळवून क्रिडा क्षेत्रात जामखेडचे नाव मोठे केले आहे. जामखेडच्या प्रत्येक नागरिकाला अभिमान वाटावा तसेच जामखेडच्या प्रत्येक खेळाडूने प्रेरणा घ्यावी अशीच कु. आंचल अमित चिंतामणी हिची कामगिरी आहे.

आंचल अमित चिंतामणी च्या यशाबद्दल तीच्यावर शैक्षणिक, सामाजिक सह विविध क्षेत्रातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आज जामखेड शहरात भव्य दिव्य फटाक्यांची आतषबाजी करत ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली होती.




