भांड्याचे प्रसिद्ध व्यापारी महेंद्र बोरा यांचे अपघातात निधन चार जखमी जामखेड मध्ये शोककळा

0
1003

 

जामखेड न्युज——

भांड्याचे प्रसिद्ध व्यापारी महेंद्र बोरा यांचे अपघातात निधन तर चार जखमी, जामखेड मध्ये शोककळा

सहा दिवस राजस्थान येथे देवदर्शन करून पुण्यावरून जामखेड येथे येत असताना सकाळी आठच्या आसपास पोखरी जवळ गाडीचे टायर फुटल्याने गाडीच्या पलट्या होऊन गाडीतील महेंद्र शांतीलाल बोरा (वय ५८ ) यांचा जागीच मृत्यू झाला तर कुटुंबातील पत्नी, मुलगा, सुन व नात गंभीर जखमी झाले आहेत. जामखेड मध्ये बातमी कळताच शोककळा पसरली जखमींवर जामखेड येथे खाजगी रुग्णालयात उपचार घेऊन पुढील उपचारासाठी नगरला हलवले.

महेंद्र बोरा हे आपल्या कुटुंबासमवेत सहा दिवस राजस्थान येथे देवदर्शनासाठी गेले होते. आज सकाळी ते पुण्यात आले पुण्यातुन सकाळी जामखेड कडे आपल्या चार चाकीने निघाले होते. ड्रायव्हरला पोखरी येथे सोडले. आणी मुलगा भुषण गाडी चालवत होता. पोखरी जवळ गाडीचा टायर फुटल्याने गाडीची पलटी झाल्याने महेंद्र बोरा यांचे जागीच निधन झाले. तर कुटुंबातील चार जण जखमी झाले जखमीवर जामखेड येथील खाजगी रुग्णालयात उपचार करत नगरला हलवले यातील तिघे गंभीर जखमी आहेत.

पोखरी जवळ गाडीची पलटी झाल्याने महेंद्र शांतीलाल बोरा वय मयत महेंद्र शांतीलाल बोरा वय ५८ जागीच मृत्यू पावले तर कुटुंबातील पत्नी रेखा महेंद्र बोरा वय ५२, मुलगा भुषण महेंद्र बोरा ३४, सुन जागृती भुषण बोरा २८,
नात लियाशा भुषण बोरा ६ गंभीर जखमी झाले आहेत. 

मुलगा भुषण गाडी चालवत होता. त्याने सीटबेल्ट लावला होता तो किरकोळ जखमी झाला प्राथमिक उपचार घेऊन घरी सोडण्यात आले तर इतर तीघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जामखेड येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेऊन नगरला हलवले आहे.

गाडी नंबर एम. एच. १६ एटी ८८०७ या गाडीने जामखेड ला येत होते. पोखरी जवळ गाडीची पलटी झाल्याने महेंद्र बोरा यांचा मृत्यू झाला तर चार गंभीर
झाले आहेत.

महेंद्र बोरा यांचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालय केले सायंकाळी पाच वाजता तपनेश्वर अमरधाम येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. घटनेची माहिती कळताच जामखेड शहरातील सर्व व्यापारी जमा झाले होते. मयत महेंद्र बोरा हे प्रसिद्ध व्यापारी जितेंद्र बोरा यांचे बंधू होते.

चौकट
अपघाती वळण

या ठिकाणी आतापर्यंत शेकडो अपघात झाले आहेत. त्यामुळे या अपघाताला मृत्यूचे वळण म्हणतात. आतापर्यंत जामखेड तसेच इतर ठिकाणचे अनेक अपघात या वळणावर झाले आहेत. त्यामुळे बांधकाम विभागाने हे वळण कमी करत रस्ता रूंद करावा अशी मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here