- जामखेड न्युज——
- सर्वात कमी व्याजदरावर चालणारी अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँक एकमेव आहे -बापुसाहेब तांबे
चांगला कारभार करून मिशन २०२७ चे टार्गेट!!
-
नवनिर्वाचित संचालक संतोष राऊत व विश्वस्त मुकुंद सातपुते यांचा पदग्रहण समारंभ संपन्न
महाराष्ट्रात नव्हे तर देशात सर्वात कमी व्याजदरावर चालणारी अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँक एकमेव आहे. आता टार्गेट मिशन २७ आहे. त्यामुळे आपल्याला सभासद हिताचे निर्णय घेत पारदर्शक कारभार करावयाचा आहे. जेणेकरून संचालक पुढील निवडणुकीत ताठ मानेने सभासदांसमोर आले पाहिजेत. असे मत बापुसाहेब तांबे यांनी व्यक्त केले.
अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे संचालक संतोष राऊत व विकास मंडळाचे विश्वस्त मुकुंद सातपुते यांचा पदग्रहण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी पदग्रहण सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्ष दिगंबर पवार माजी शिक्षण विस्तार अधिकारी जामखेड, प्रमुख पाहुणे प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष व गुरुमाऊली मंडळाचे सर्वेसर्वा नेते बापूसाहेब तांबे, जिल्हा अध्यक्ष गुरुमाऊली मंडळ 2015 राजाभाऊ साळवे ,गोकुळ कळमकर कार्यकारी अध्यक्ष प्राथमिक शिक्षक संघ अहमदनगर, साहेबराव अनाप मा.चेअरमन शिक्षक बँक,संतोष दुसंगे मा.चेअरमन शिक्षक बँक,अनिल भवार साहेब मा.विश्वस्त विकास मंडळ संतोष मगर विश्वस्त विकास मंडळ, संदीप मोटे संचालक शिक्षक बँक बाळासाहेब सरोदे संचालक शिक्षण बँक,बाळासाहेब तापकीर संचालक शिक्षक बँक, महेश भनभणे संचालक शिक्षक बँक,नवनाथ दिवटे विश्वस्त विकास मंडळ, गौतम साळवे,प्रदीप बोरूडे,प्रमोद शिर्के, मच्छिंद्र लोखंडे, इकडे सर ,खडे सर ,गिरी सर ,बजरंग गोडसे सर ,आबासाहेब सूर्यवंशी सर, जामखेड मधून महिला तालुका अध्यक्ष निशा कदम,कल्पना गायकवाड,राज्य नेते किसनराव वराट, माजी विश्वस्त गोकुळ गायकवाड, केशव गायकवाड, बाबासाहेब कुमटकर, हनुमंत गायकवाड, विनोद सोनवणे ,विकास बगाडे, एकनाथ चव्हाण अध्यक्ष जामखेड तालुका प्राथमिक शिक्षक संघ ,जालिंदर भोगल,श्रीहरी साबळे, शहाज जगताप, मोहन खवळे, सदाशिव भालेराव ,बळीराम अवसरे,नाना मोरे, राजीव मडके, अर्जुन पवार ,रामहरी बांगर, सचिन पवार,गौतम सोले,सतीष सदाफुले, गणेश कात्रजकर, वारे सर,बँकचे शाखाप्रमुख मुकुंद ढवळे व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना बापुसाहेब तांबे म्हणाले की, आम्ही उत्तम कारभार केला, प्रश्नांची जाण असणारे चांगले उमेदवार दिले, तसेच संचालकांचे काम सभासद पर्यंत पोहोचणारी टीम बरोबर होती या त्रिसूत्री मुळे व पारदर्शक कारभारामुळे परत बँकेचा कारभार करण्याची संधी सभासदांनी दिली आहे या संधीचे सोने करण्यासाठी अधिक चांगला कारभार करावयाचा आहे यासाठी देशातील चांगल्या बँकांचा अभ्यास करा त्यात काय चांगले आहे ते आपण स्विकारू, बँकेच्या गतीमान कारभारासाठी चांगले साॅफ्टवेअर आणावयाचे आहे यासाठी बँकेतील कर्मचारी वर्गानेही कार्पोरेट बँक प्रमाणे वागा असे आवाहन केले.
यापुढे कोणत्याही कार्यक्रमात फेटे आणू नका वायफळ खर्च करू नका फेट्याऐवजी पुस्तक भेट द्या, बँक भीसी म्हणून चालवायची नाही तर एक आदर्श बँक चालवायची आहे. यासाठी नियोजन करावे लागणार आहे तसेच कोणताही निर्णय घेतला तरी विरोधक टिका करणार आहेत त्यामुळे कारभार पारदर्शक करावयाचा आहे.
विकास मंडळाच्या विश्वस्तांनीही चांगल्या ट्रस्ट चा अभ्यास करून काय चांगले करता येईल याचे नियोजन करा आपल्याला चांगले व्हाँस्पीटल उभारावयाचे आहे याचेही नियोजन करावे प्रत्येकाने चांगला अभ्यास करून चांगल्यात चांगले काय करता येईल हे पाहावयाचे आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार एकनाथ चव्हाण यांनी केले