Friday, February 13, 2026
Home ताज्या बातम्या द. कृ. राळेभात यांचे निधन, प्राथमिक शिक्षकांचे सक्षम नेतृत्व हरपले

द. कृ. राळेभात यांचे निधन, प्राथमिक शिक्षकांचे सक्षम नेतृत्व हरपले

0
219

जामखेड न्युज——

द. कृ. राळेभात यांचे निधन, प्राथमिक शिक्षकांचे सक्षम नेतृत्व हरपले

प्राथमिक शिक्षक संघाचे ज्येष्ठ नेते,शिक्षक बँकेचे माजी चेअरमन दत्तात्रय कृष्णाजी राळेभात गुरुजी यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. यामुळे शिक्षकांचे एक सक्षम नेतृत्व हरपले आहे. अंत्यसंस्कार उद्या सोमवारी सकाळी ७.३०वाजता भुतवडा येथील शेतामध्ये होणार आहेत. 

   दत्तात्रय कृष्णाजी राळेभात  गुरूजी हे प्राथमिक शिक्षकांचे एक सक्षम नेतृत्व होते. १९९४ ते १९९९या काळात ते अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे संचालक होते तर १९९८-९९ मध्ये ते चेअरमन होते. तसेच महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे ते नाशिक विभागीय अध्यक्ष होते. निधनाची बातमी कळताच शिक्षक, मित्र व नातेवाईक यांच्या वर दु:खाची शोककळा पसरली आहे. 
शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी ते नेहमी अग्रभागी असत. जिल्ह्यातील शिक्षक अडी अडचणी घेऊन त्यांच्या कडे येत असत. ते शिक्षकांचे दक्षिणेतील एक सक्षम नेतृत्व होते. त्यांनी केंद्रप्रमुख म्हणूनही सक्षम काम पाहिले होते. 
त्यांचा मुलगा विवेक पीएसआय आहे तर आनंद व उमेश शेतीत आहेत. 

   चौकट

द. कृ. राळेभात नगर जिल्हा शिक्षक बँकेचे चेअरमन असताना १९९८- ९९ मध्ये शिक्षकांना सर्वात जास्त लाभांश २५ टक्के दिला होता. सर्वात जास्त लाभांश देणारे चेअरमन म्हणून त्यांची ख्याती सगळीकडे पसरली होती. आजपर्यंत कोणत्याही चेअरमन ने एवढा लाभांश दिलेला नाही. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!