Friday, February 13, 2026
Home ताज्या बातम्या समाजकारणातून तरूणांच्या गळ्यातील ताईत बनलेले प्रा. सचिन गायवळ सर आगळेवेगळे व्यक्तीमत्व

समाजकारणातून तरूणांच्या गळ्यातील ताईत बनलेले प्रा. सचिन गायवळ सर आगळेवेगळे व्यक्तीमत्व

0
203

 

जामखेड न्युज——
समाजकारणातून तरूणांच्या गळ्यातील ताईत बनलेले प्रा. सचिन गायवळ सर आगळेवेगळे व्यक्तीमत्व

खर्डा जिल्हा परिषदे गटासाठी हसतमुख तरुणाईचा आश्वासक चेहरा म्हणून प्रा. सचिन सर गायवळ यांच्याकडे पाहिले जाते..

जामखेड तालुक्याचे दक्षिण भागामध्ये म्हणजे खर्डा जिल्हा परिषद गटात काम करत असताना सोनेगाव येथील युवक नेतृत्व सचिन सर गायवळ यांनी समाजकारण व राजकारणाच्या माध्यमातून परिसरात व जामखेड तालुक्यातील आपल्या समाजसेवेतून एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

सचिन सर यांनी समाजकारणाची सुरुवात अनेक वर्षापासून सुरू केली आहे खर्डा व नान्नज परिसरात समाजकारण व राजकारणात ते सतत सक्रिय राहिले अनेक तरुणांचे प्रश्न सोडविले तसेच तरुणांनी उद्योग व व्यवसाय करण्यासाठी प्रयत्न करावेत यासाठी ते सतत प्रयत्नशील राहिले व आजही ते त्यासाठी काम करीत आहेत.

संघर्ष व सतत हसतमुख असणारे युवा नेतृत्व कसे असते हे सचिन सर गायवळ यांच्याकडे पाहिल्यानंतर समजते जामखेड तालुक्याच्या दक्षिण भागात सर्व जाती धर्मातील युवकांची फौज सोबत असलेले दमदार नेतृत्व म्हणून आज सचिन सर यांच्याकडे पाहिले जाते.

खर्डा भागामध्ये राजकीय कार्यास सुरुवात करत असताना 2014 च्या लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते माननीय धनंजय मुंडे साहेब यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात हजारो कार्यकर्त्यासहित त्यांनी प्रवेश करून मोठी खळबळ उडून दिली होती आणि खऱ्या अर्थाने त्यांचा राजकीय कार्याला त्यावेळेस पासून सुरुवात झाली होती.

पक्ष पातळीवर काम करीत असताना समाजातील अनेक प्रश्न त्यांनी स्वतः सोडविले व अनेकांना कामाच्या माध्यमातून न्याय मिळवून दिला आहे नंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत नवखे असणारे रोहित पवार यांचा प्रचार त्यांनी करून विधानसभेच्या निवडणुकीत मोठे मताधिक्य देण्याचे मोलाचे काम त्यांनी केले होते.

त्यानंतर कोरोनाच्या काळात त्यांच्या परिवाराने आमदार रोहित पवार यांच्या आवाहना नुसार गोरगरीब जनतेला अन्नधान्य, अनेक गावात मोफत पाण्याची टॅंकरने पाणीपुरवठा केला, आरोळे कोवीड सेंटर व यांच्या हॉस्पिटलला लाखो रुपयांचे औषधे देऊन अनेक गोरगरीब जनतेला लॉकडाऊन च्या काळात आर्थिक मदत सुद्धा केली आहे.

तसेच जामखेड तालुक्यातील शासकीय कार्यालयाला सॅनिटायझर मशीन भेट दिल्या अशा पद्धतीने लाखो रुपयांचा खर्च त्यांनी समाजाला आपण काहीतरी देणे लागतो या निरपेक्ष भावनेने त्यांनी मदतीचा हात समाजातील वंचित असणाऱ्या घटकाला दिल्याने त्यांची आजही जनसामान्यातली प्रतिमा उजळून निघत आहे.

ते सतत काम करीत असताना त्यांचे विरोधक छुप्या पद्धतीने आमदार रोहित पवार यांच्याकडे कान भरण्याचे काम करीत होते, परंतु त्यांनी त्याची कधीही दखल घेतली नाही व ते पुढेही समाजासाठी व युवकांच्या प्रश्नासाठी काम करीतच राहिले.
तसेच पुढील झालेल्या तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतच्या निवडणुका बिनविरोध करण्यासाठी युवकांमध्ये जनजागृती करून रात्रीचा दिवस एक केला व निवडणुकीत होणारा लाखो रुपयांचा खर्च टाळून त्यांनी अनेक ग्रामपंचायती बिनविरोध करण्यासाठी जिवाचे रान केले व बहुसंख्य ग्रामपंचायती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ताब्यात आणण्यासाठी त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केला.

तरीही त्यांनी याचे श्रेय घेण्याचा कधीही प्रयत्न केला नाही, का कधीही बडेजाव पणा केला नाही परंतु समाजात काम करीत असताना अनेक मित्र त्यांनी जोडले सचिन सर यांच्या संपर्कात जाणारा कोणताही व्यक्ती सरांना कायम आपलासा करून जात आहे.

प्रत्येक तरुण सहकार्याच्या पाठीमागे आजही सचिन सर खंबीरपणे उभे आहेत संघर्षाला झिडकारत त्यांनी आपले समाजाप्रती असलेले काम सुरू ठेवले आहे राजकारण करीत असताना त्यांनी सोनेगाव येथील स्वतःच्या गावची ग्रामपंचायत दहा वर्षापासून बिनविरोध केली आहे तसेच धनेगाव येथील सेवा सहकारी सोसायटीमध्ये स्वतः दणदणीत मतांनी निवडून येऊन संपूर्ण पॅनलला बहुमत मिळवून देण्यासाठी मोठा करिष्मा करून दाखवला होता व ती निवडणूक एकतर्फी जिंकली होती.

सोनेगाव येथील गावाच्या सर्वांगीण विकासासाठी मोठ्या झपाट्याने त्यांनी कामास सुरुवात केली.
खर्डा शहर व परिसरात त्यांना मानणारा मोठा युवक वर्ग तयार झाला आहे येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांची उमेदवारी भल्याभल्यांना पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती खर्डा जिल्हा परिषद गटात आज निर्माण झाली आहे.

खर्ड्या सारख्या विकसनशील असलेल्या या भागाचा राजकीय, सामाजिक, भविष्याचा व विकासाचा तसेच तरुणांचा एक आश्वासक चेहरा म्हणून सचिन सर गायवळ यांच्याकड पाहिले जात आहे हे मात्र नक्की आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!