Friday, February 13, 2026
Home ताज्या बातम्या रत्नदीप मार्फत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस.

रत्नदीप मार्फत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस.

0
214

 

जामखेड न्युज——

रत्नदीप मार्फत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस.

रत्नदीप मेडिकल फौंडेशन अ‍ॅन्ड रिसर्च सेंटर रत्नापूर तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर या संस्थेच्या रत्नदीप शैक्षणिक संकुलातील बीएचएमएस फार्मसी व नर्सिंग महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस देऊन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांची दिवाळी गोड करून त्यांचा आनंद द्विगुणित करण्यात आला.

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.भास्करराव मोरे पाटील व सेक्रेटरी डॉ.सौ.वर्षा मोरे पाटील यांनी हा निर्णय घेऊन सामाजिक बांधिलकी जोपासण्याची आपली परंपरा कायम राखली आहे.याबाबत बोलताना डॉ. भास्करराव मोरे पाटील म्हणाले की आम्ही आमच्या रत्नदीप मेडिकल फौंडेशन अ‍ॅन्ड रिसर्च सेंटर रत्नापूर तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर या संस्थेच्या रत्नदीप शैक्षणिक संकुलातील बीएचएमएस,फार्मसी व नर्सिंग महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना प्रत्येकी रूपये पाच हजार इतकी रक्कम दिवाळी बोनस म्हणून जाहीर करून वितरीत करण्यात आली.

तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर महिन्याचा पगार आगाऊ वितरीत करण्यात आला. तसेच संस्थेच्यामार्फत सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ब्लेझर-कोट भेट देण्यात आले. याबद्दल सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी समाधान व आनंद व्यक्त करून संस्थेचे अध्यक्ष डॉ.भास्करराव मोरे पाटील व सेक्रेटरी डॉ.सौ.वर्षा मोरे पाटील यांचे आभार मानले आहेत.यावेळी रत्नदीप फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. जितेंद्र कुमार,नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्य सौ. प्रज्ञा पुजारी,

रत्नदीप होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजचे प्रप्राचार्य डॉ.संदीप सांगळे यांच्यासह,डॉ. सरफराज खान, डॉ.गफ्फार शेख,सौ.डॉ.झेबिया शेख,डॉ.संजय पोपळे,डॉ.सुग्रीव घोडके, डॉ.सौ.श्रध्दा मुळे,डॉ.दिपाली सांगळे,डॉ.मनिषा बांगर,रवींद्र ढवळे,प्रशांत राळेभात,रोहित राळेभात,धनराज ढफळ,अशोक पवार,जीवन पवार,सौ.अनिता काळे, कु.पुजा खडताळे, क.सय्यद,सचिन पवार आदी उपस्थित होते.

डॉ.भास्करराव मोरे पाटील यांनी रत्नदीप मेडिकल फौंडेशन अ‍ॅन्ड रिसर्च सेंटर रत्नापूर तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर या संस्थेच्या माध्यमातून करत असलेल्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून आपली संपूर्ण राज्यात आपली ओळख निर्माण केली आहे. कोरोना आपत्तीच्या काळात देखील त्यांनी जामखेड तालुक्यातील लोकांसाठी विविध सामाजिक उपक्रम राबविले. रत्नदीप मेडिकल फौंडेशन अ‍ॅन्ड रिसर्च सेंटर रत्नापूर तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर या संस्थेच्या रत्नदीप शैक्षणिक संकुलात होमिओपॅथिक, नर्सिंग,फार्मसी अभ्यासक्रमाचे महाविद्यालय असून याठिकाणी राज्यातील विविध जिल्ह्य़ातील जवळपास बाराशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

चौकट 
रत्नदीप मेडिकल फौंडेशन अ‍ॅन्ड रिसर्च सेंटर रत्नापूर तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर या संस्थेचे रत्नदीप शैक्षणिक संकुल ही रत्नदीप फॅमिली असुन येथे सर्व विद्यार्थी-विद्यार्थीनी व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कौटुंबिक वातावरण मिळत असुन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.भास्करराव मोरे पाटील व सेक्रेटरी डॉ.सौ.वर्षा मोरे पाटील हे रत्नदीप फॅमिलीचे पालक असुन वेळोवेळी ते दोघेही पालकांची भुमिका बजावतात याचा आम्हां सर्वांना सार्थ अभिमान व आनंद आहे. संकुलातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस व आगाऊ पगार दिल्याबद्दल मी सर्वांच्यावतीने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.भास्करराव मोरे पाटील व सेक्रेटरी डॉ.सौ.वर्षा मोरे पाटील यांना धन्यवाद देते व आभार व्यक्त करते.
सौ. प्रज्ञा पुजारी
प्राचार्या, रत्नदीप नर्सिंग कॉलेज रत्नापूर
तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!