जामखेड न्युज——
पाटोदा येथील भवर नदीवरील पुल तिसऱ्यांदा गेला वाहुन
वाहतूक फक्राबाद कुसडगाव मार्गे वळवण्यात आली
तालुक्यातील पाटोदा येथील भवर नदीवरील राष्ट्रीय महामार्गावरील नदीवरील पुलाचे तात्पुरते काम
तीन वेळा केले होते सततच्या पावसामुळे परत वाहुन गेला आहे. त्यामुळे वाहतूक परत फक्राबाद कुसडगाव मार्गे वळवण्यात आली आहे.

आमदार रोहित पवार व आमदार प्रा. राम शिंदे यांनी पाहणी करून लवकरच रस्ता सुरू करण्यासाठी ठेकेदाराला सूचना दिल्या होत्या ठेकेदाराने तीन वेळा पुल दुरूस्त केला व तीन वेळा वाहुन गेला आहे.

जामखेड-कर्जत हा रस्ता वाहतुकीसाठी सतत बंद होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत.

राष्ट्रीय महामार्ग अधिकारी व ठेकेदार यांच्याशी चर्चा करून या पुलाचे काम तातडीने मार्गी लावून हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याच्या सूचना केल्या असल्याचे आ. शिंदे यांनी सांगितले. नागरिकांनी पूर आल्यावर नदी ओलंडू नये, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य दिनकर टापरे, सदाशिव कवादे, पंढरीनाथ शिकारे, पप्पू पारवे, अशोक महारनव, दिलीप कवादे, अक्षय आमटे, गफार पठाण, केदार वाबळे, अनिरुद्ध थोरात, देवा मोरे, दिलीप शिकारे, राजू कवादे, खंडू कवादे, विष्णू बामदळे, दादा मेडकर, बाबासाहेब गरड, दत्तू भवर आदी उपस्थित होते.

पूलाची उंची वाढविण्याची गरज
भवर नदीला पाणी आष्टी तालुक्यातील मुगगाव, मातावळी, मातकुळी, वनवेवाडी, करेवडगाव, पांढरी, पोखरी, हरिनारायण आष्टा व भातोडी या परिसरातून येते. पाटोदा येथे नदीवरील पुलाची उंची कमी असल्याने जास्त पाऊस झाल्यास पूल पाण्यात जाण्याचा धोका आहे. त्यामुळे पुलाची उंची वाढवण्याची गरज असल्याचे मत पाटोदा येथील माजी सरपंच गफार पठाण यांनी जामखेड न्युजशी बोलताना केली आहे.




