जामखेड न्युज——
जामखेड नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी जिल्हाधिकारी यांच्या निवासा समोर – ॲड. डॉ. अरुण जाधव
_________________________________
जामखेड नगर परिषद कर्मचारी यांची माहे सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्याचे वेतन दिवाळी सणाकरिता अदा करण्यात यावेत तसेच खालील प्रमाणे मागणीची दखल घ्यावी. १) जामखेड नगर परिषदेतील कर्मचाऱ्यांकडे अतिरिक्त कामकाज देऊन त्यांनी दिलेले सदर कामकाज केले नाही म्हणून १०% पगार कपात केली आहे ती तात्काळ मिळावी.
२) जामखेड नगरपरिषद कर्मचारी यांची जुलै महिन्याची वार्षिक वेतन वाढ तात्काळ देण्यात यावी. ३) ७ व्या वेतन आयोगाच्या थकीत फरकाचे हप्ते कर्मचारी यांना तत्काळ देण्यात यावेत.
४) जामखेड नगरपरिषद कर्मचारी यांचाकडे दिलेला अतिरिक्त कामकाज तात्काळ काढून घेण्यात यावे. या मागण्या पूर्ण नाही झाल्यास *दि.२४/१०/२०२२ रोजी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय समोर सर्व*कामगाराच्या मुलं बाळ सहित दिवाळी साजरी करणार याची आपण दखल घ्यावी असे आव्हान ॲड. डॉ. अरुण जाधव यांनी केले.
सातत्याने नगरपरिषद कर्मचाऱ्यांची गेली दोन वर्षापासून सतत कामगारांच्या पगारांना विलंब केला जातो. त्याचबरोबर कामगारांची सी. ओ. कडून होणारी पिळवणूक तसेच शहरांमध्ये सतत कुठल्या ना कुठल्या मुद्द्यावर लोकांच्या सोबत होणारा विनाकारण वाद यामुळे जामखेडची *जनता नगर परिषद सी.ओ. मिनीनाथ दंडवते. यांना कंटाळून गेलेले आहे.
परंतु जामखेड कर्जत मधील काही राजकीय पुढाऱ्यांना वारदस्त असल्यामुळे डायरेक्ट जामखेड येथील जनतेच्या पिळवणूक शोषणाचे लायसन देऊन टाकलेले आहे. वारंवार मार्केट मधील जनतेने तक्रार करूनही त्यांची बदली होत नाही. या सर्व घडामोडी शासनाने च्या निदर्शनास आणून देण्यासाठी व नगरपरिषद कामगारांचा पगार वेळोवेळी होण्यासाठी दिनांक २४/ १० /२०२२ या रोजी जिल्हाधिकारी यांच्या कार्यालय येथे जामखेड शहरातील सर्व कर्मचारी दिवाळी साजरी करणार असे आव्हान ॲड.डॉ. अरुण जाधव यांनी केले.