जामखेड न्युज——
सावधान श्री नागेश विद्यालय सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या कक्षेत..
सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून विद्यार्थी विद्यार्थिनींचे सुरक्षितता वाढणार- ए पी आय सुनील बडे.
श्री नागेश विद्यालय सीसीटीव्ही लोकार्पण सोहळा संपन्न.
रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश विद्यालय व जुनिअर कॉलेज विद्यालय मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत संपूर्ण विद्यालय आता सीसीटीव्ही कॅमेरेच्या कक्षेत आलेले आहे.
विद्यालयाला होणारा अनावश्यक त्रास विद्यार्थीनीच्या सुरक्षितेसाठी तसेच टवाळखोर रोड रोमयोवर चपराक बसवण्यासाठी विद्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत हा उपक्रम अतिशय छान विद्यार्थ्यांच्या हिताचा आहे असे मनोगत एपीआय सुनील बडे यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती जामखेड पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष एपीआय सुनील बडे
स्कूल कमिटीचे ,रा कॉ महाराष्ट्र राज्य प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी,प्राचार्य मडके बी के , शालेय व्यवस्थापन अध्यक्ष अशोक यादव ,माजी उपप्राचार्य प्रकाश तांबे,पर्यवेक्षक रघुनाथ मोहळकर पालक शिक्षक संघ उपाध्यक्ष अमोल बहिर ,अजय अवचरे, विनायक राऊत ,राजेंद्र गोरे, महेश घुमरे, कुंडल राळेभात, प्रा राहुल आहेरे ,पोलीस कॉन्स्टेबल अविनाश ढेरे ,पोलीस कॉन्स्टेबल आबासाहेब आवारे , प्रा रमेश बोलभट, धनराज पवार, एनसीसी प्रमुख मयूर भोसले ,अशोक सांगळे, संभाजी इंगळे,रणदिवे एस आर, लबडे डी बी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
सीसीटीव्ही बसवण्यासाठी नागेश विद्यालय चे उपप्राचार्य प्रकाश तांबे यांनी सेवापुर्ती समारंभामध्ये 51 हजार रुपये मदत केली तसेच शालेय व्यवस्थापन समिती, पालक शिक्षक संघ सर्व शिक्षक यांच्या देणगीतून सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत.
नागेश विद्यालय सीसीटीव्ही बसवल्यामुळे जामखेड पोलीस विभाग सर्व पालक , शिक्षक ग्रामस्थ यांच्याकडून विद्यालयाचे कौतुक होत आहे.
![]()
राजेंद्र कोठारी यांनी मनोगत मध्ये विद्यालयाच्या सर्वांगीण विकास होत चालला आहे सीसीटीव्ही बसवल्यामुळे विद्यालयाची सुरक्षितता वाढलेली आहे असे मत व्यक्त केले. प्राचार्य मडके बीके यांनी सर्व आभार मानले.