माजी ग्रामपंचायत सदस्य संजय काळे यांच्या आत्महत्येमुळे खर्डा परिसरात एकच खळबळ

0
171

 

जामखेड न्युज——

माजी ग्रामपंचायत सदस्य संजय काळे यांच्या आत्महत्येमुळे खर्डा परिसरात एकच खळबळ

खर्डा ग्रामपंचायतचे मा.सदस्य संजय काळे यांच्या आत्महत्याने खर्डा शहरात खळबळ.खाजगी सावकारकीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची ग्रामस्थांमधून दबक्या आवाजात चर्चा?
खर्डा ग्रामपंचायतचे मा.सदस्य संजय काळे यांच्या आत्महत्याने खर्डा शहरात खळबळ..

खाजगी सावकारकीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची ग्रामस्थांमधून दबक्या आवाजात चर्चा?

याबाबत मिळालेली माहिती अशी की खर्डा ग्रामपंचायतचे मा. ग्रामपंचायत सदस्य संजय विष्णू काळे वय 53 वर्ष यांनी 17 ऑक्टोबर 2022 रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास घरात राहत्या घरी कोणीही नसताना आत्महत्या केल्याने खर्ड्यात एकच खळबळ उडाली आहे.

संजय काळे यांचे खर्डा शहरातील मेनरोड येथे कटिंग सलूनचे दुकान आहे,ते खर्डा ग्रामपंचायतचे माजी सदस्य होते. काळे हे अतिशय मनमिळावू व शांत स्वभावाचे होते त्यांनी अनेक खाजगी सावकारांकडून पैसे घेतल्याचे समजते आहे? त्या सावकारांच्या जाचाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे ग्रामस्थांमधून दबक्या आवाजात चर्चिले जात आहे.

त्यांच्या मागे पत्नी व एक मुलगा आहे.
घटनास्थळी पोलिसांनी समक्ष भेट देऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी जामखेड येथील ग्रामीण आरोग्य केंद्रात पाठवला आहे.

पुढील तपास खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल शेषराव मस्के व पोलीस कॉन्स्टेबल खाडे हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here