आष्टी तालुक्यातील शेतकऱ्याची अतिवृष्टीला कंटाळून आत्महत्या

0
267

जामखेड न्युज——

आष्टी तालुक्यातील शेतकऱ्याची अतिवृष्टीला कंटाळून आत्महत्या

दोन दिवसांपूर्वी केज तालुक्यातील राजेगाव येथील शेतकऱ्याने अतिवृष्टीला कंटाळून आत्महत्या केली होती रविवारी आष्टी तालुक्यातील पांढरी तालुक्यातील शेतकऱ्याने अतिवृष्टीला कंटाळून आत्महत्या केली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

आष्टीसह परिसरातील गावात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून अतिवृष्टीने हाहाकार माजवला आहे. पांढरी परिसरात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेल्या सगळ्या पिकांचे अतोनात नुकसान झाले. रविवारी जोर ‘धार’ पाऊस सुरु असून पांढरीच्या एका शेतकऱ्याने या अतिवृष्टीला कंटाळून गळफास
घेत जीवन संपविल्याचे समोर आले आहे.

दादासाहेब बाबुराव वांढरे (वय ५५) असे त्या मृत शेतकऱ्याचे नाव आहे. आष्टी तालुक्यातील पांढरी येथील स्वतःच्या शेतातील शेडमध्ये गळफास घेत दादासाहेब यांनी टोकाचे पळस पाऊल उचलले. त्यांच्याकडे तीन ते चार एकर शेती आहे. पावसाने जोर ‘धार’ हजेरी लावल्यामुळे शेतातील सर्व पिकांचे नुकसान झाले असून
अद्याप पंचनामे ही पूर्ण झाले नाही. तर मदतीसाठी अद्याप कोणतीही घोषणा झालेली नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

दरम्यान दादासाहेब यांच्या पश्चात्य एक मुलगा, चार मुली, पत्नी असा परिवार असून आष्टी पोलीस ठाण्यात या प्रकरणी आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

तातडीने पंचनामे करून द्या मदत गावातील दादासाहेब बाबुराव वांढरे यांनी गळफास घेऊन केलेली आत्महत्या अत्यंत चिंताजनक बाब आहे. अतिवृष्टीमुळे पिके भुईसपाट झाली असून शेतकऱ्यांच्या हातातून पूर्णपणे खरीप हंगाम गेला आहे. जिल्हा प्रशासनाने तातडीने पंचनामे करत राज्य सरकारने शेतकऱ्यांना भरीव मदत करावी
अन्यथा बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा आकडा प्रचंड वाढविण्याची भीती पांढरी गावचे सरपंच सुधीर पठाडे यांनी जामखेड न्युजशी बोलताना व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here