जामखेड न्युज——
आमदार प्रा. राम शिंदे यांच्या सूचनेनुसार पाटोदा येथील भवर नदीवर तात्पुरता रस्ता कामाला सुरुवात ग्रामस्थांनी मानले आमदार प्रा. शिंदे यांचे आभार
आठ दिवसांपूर्वी तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पाटोदा येथील भवर नदीवरील पूल वाहुन गेला होता श्रीगोंदा येथून जामखेड ला येणारा रस्ता बंद झाला होता. वाहतूक फक्राबाद कुसडगाव मार्गे वळवली होती तेव्हा आमदार प्रा. राम शिंदे यांनी पाटोदा येथे जाऊन पाहणी केली होती व ठेकेदाराला तात्पुरता रस्ता तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या त्यानुसार ठेकेदाराने ताबडतोब तात्पुरता रस्ता सुरू केला आहे. त्यामुळे पाटोदा ग्रामस्थांनी आमदार प्रा. राम शिंदे यांचे आभार मानले.
माननीय आमदार प्रा राम शिंदे साहेब यांनी अधिकारी व ठेकेदार यांना सूचना केल्या नंतर आज नदीचे पाणी कमी झाल्याने जामखेड श्रीगोंदा मार्गावरील पाटोदा जवळील भवर नदीवर तात्पुरता रस्ता सुरु करण्याचे काम ठेकेदार यांनी सुरू केल्याबद्दल साहेबांचे आभार
पहाणी करताना जामखेड भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष पै. शरद दादा कार्ले, ग्रा पं सदस्य मा सदाशिव कवादे, संचालक अंगद गव्हाने, सरपंच समिर पठान, सरपंच प्रदिप माने,ग्रामपंचायत सदस्य पांडुराजे शिंदे,संचालक सिद्धार्थ थोरात,मा ग्रा पं सदस्य मा सत्तारभाई पानसरे, भाजपा युवा नेता मा स्वप्निल मुरुमकर,व पाटोदा ग्रामस्त उपस्थित होते.