जामखेड न्युज——
दोन टायर व मॅकव्हील जागीच फुटले
डॉ.भास्करराव मोरे पाटील यांच्या वाहनाला चास जवळ भिषण अपघात सुरक्षेतेच्या सुविधांमुळे कुटूंब बचावले
जामखेड – रत्नदीप मेडिकल फौंडेशन अॅन्ड रिसर्च सेंटर रत्नापूर तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.भास्करराव मोरे पाटील व सेक्रेटरी डॉ.सौ.वर्षा मोरे पाटील व त्यांचे कुटुंबीय यांच्या गाडीला भीषण अपघात झाला असुन ते थोडक्यात बचावले आहेत.
डॉ.भास्करराव मोरे पाटील व त्यांचे कुटुंबीय काल रात्री पुणे येथून जामखेड कडे स्वतःच्या मर्सिडीज कारने येत असताना अहमदनगर-पुणे हायवेवर चास शिवारात त्यांच्या गाडीचा अपघात झाला.हायवेवर रस्त्यावर पडलेल्या मोठ्या दगडावर ड्रायव्हरच्या दुर्लक्षामुळे गाडी गेल्यामुळे गाडीचे उजव्या बाजूचे दोन्ही टायर व मॅकव्हील जागीच फुटले व मोठा अपघात झाला. गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून सुदैवाने कोणालाही मोठी शारीरिक इजा झाली नाही. मर्सिडीज गाडीत असलेल्या सुरक्षिततेच्या सुविधांमुळे डॉ. भास्करराव मोरे पाटील व त्यांचे कुटुंबीय बालंबाल बचावले.
डॉ.भास्करराव मोरे पाटील यांनी रत्नदीप मेडिकल फौंडेशन अॅन्ड रिसर्च सेंटर रत्नापूर तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर या संस्थेच्या माध्यमातून करत असलेल्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून आपली संपूर्ण राज्यात आपली ओळख निर्माण केली आहे. कोरोना आपत्तीच्या काळात देखील त्यांनी जामखेड तालुक्यातील लोकांसाठी विविध सामाजिक उपक्रम राबविले. रत्नदीप मेडिकल फौंडेशन अॅन्ड रिसर्च सेंटर रत्नापूर तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर या संस्थेच्या रत्नदीप शैक्षणिक संकुलात होमिओपॅथिक, नर्सिंग,फार्मसी अभ्यासक्रमाचे महाविद्यालय असून याठिकाणी राज्यातील विविध जिल्ह्य़ातील जवळपास बाराशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.