जामखेड न्युज——
विरोधकांकडून सभासदांची दिशाभूल- महिला आघाडी दक्षिण जिल्हा प्रमुख श्रीमती छाया जाधव!!
गुरु माऊली मंडळाने बँकेचा कारभार करत असताना सन 2020- 21 मध्ये 10.10% डिव्हिडंड दिला आहे, मात्र सभासदांची दिशाभूल करून ते पाच- पाच टक्के डिव्हिडंट दोन वर्षाचा दिला आहे अशी दिशाभूल करत आहेत… प्रत्यक्षात 10.10% हा डिव्हिडंट 2020-21 चा दिलेला आहे. 19- 20 चा डिव्हिडंड वाटण्यासाठी रिझर्व बँकेने निर्बंध लादलेले आहेत. त्यामुळे सदर नफा हा रिझर्व फंडात वर्ग करण्यात आलेला आहे. परंतु दोन वर्षांचा पाच- पाच टक्केच डिव्हिडंट दिला अशा प्रकारची दिशाभूल विरोधक सभासदांना करत आहेत.
बापूसाहेब तांबे प्रणित गुरुमाऊली मंडळ 2015 मे गेल्या साडेतीन वर्षात अतिशय उत्कृष्ट कारभार केला आहे त्यामुळे विरोधक सभासदांच्या कायम ठेवीवरील व्याजदर, डिव्हिडंड, कर्जावरील व्याजदर याविषयी न बोलता इतर मुद्द्यांवर लक्ष विचलित करून सभासदांचा बुद्धिभेद करीत आहेत.
सभासदांनी या खोट्या भूलथापांना बळी पडू नये. गुरुमाऊली मंडळाने सभासदांची पत आणि प्रतिष्ठा वाढवली आहे. कर्ज मर्यादा 9 लाखांवरून 35 लाखापर्यंत वाढवली आहे. कर्जाचा व्याजदर कमी करून सभासदांना दिलासा दिला आहे. दीडशे महिलांना सावित्रीच्या लेकी पुरस्कार देऊन महिला सभासदांची प्रतिष्ठा वाढवली आहे. त्यामुळे 16 ऑक्टोबरला होणाऱ्या निवडणुकीत सभासदांचे हित जोपासणाऱ्या व कामधेनूचा विकास साधणाऱ्या तांबे प्रणित गुरुमाऊली मंडळ 2015, शिक्षक एकल मंच, ऐक्य मंडळ व शिक्षक भरती आघाडीला प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन महिला आघाडीच्या दक्षिण जिल्हाप्रमुख श्रीमती छाया जाधव यांनी केले.
यावेळी जामखेड तालुक्याच्या महिला आघाडी प्रमुख श्रीमती निशा कदम, कार्याध्यक्ष मीना बोडके, प्रसिद्ध प्रमुख कल्पना गायकवाड, उपाध्यक्ष सुलभा हजारे, आशा नेटके, शितल काळे, शबाना शेख, कल्पना ससाणे व बहुसंख्य महिला उपस्थित होत्या.