जामखेड न्युज——
सत्ता पिपासूंना शिक्षक सभासद योग्य धडा शिकवतील -विकास बगाडे
विजयाचा गुलाल तांबे गटाचाच

अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेसाठी रविवार दि. १६ ऑक्टोबर रोजी मतदान होत आहे. सदर निवडणुकीत सत्तेची हाव असणारे नेते यांना वेळीच रोखावे. एका मंडळाचे नेते जे साडेआठ वर्ष शिक्षक बँकेचे संचालक राहिले, रेकॉर्ड ब्रेक साडेतीन वर्षे चेअरमन राहिले, स्वतः पुन्हा चेअरमन राहावे म्हणून न्यायालयात याचिका दाखल केली. त्यांनी सभासदांना फक्त पॉईंट पंचवीस व्याजदर कमी करून सभासदांच्या तोंडाला पाणी पुसली. त्यांच्याच मंडळातील चार संचालक साडेसहा वर्ष संचालक राहून सुद्धा त्यांना सत्तेची खुर्ची सोडू वाटत नाही, त्यांना मंडळाने पुन्हा उमेदवारी दिली . तसेच मंडळ आणि संघटनेचे दोन्ही नेते यांनी सुद्धा उमेदवाराची माळ स्वतःच्या गळ्यात घेतली, अशा व्यक्तींना वेळीच रोखले पाहिजे.

या व्यक्तींना सेवा करण्यासाठी नव्हे तर सत्तेची खुर्ची इतरांना मिळू नये यासाठी ते बँक लढवत आहेत. त्यांचा स्वार्थ यामध्ये दडलेला आहे. म्हणूनच ते कार्यकर्त्यांना नव्हे तर नेत्यांना व नातेवाईकांना उमेदवारी देत आहेत. ते सभासदांचे हित काय साधणार? बँकेच्या 11000 सभासदांमधून या मंडळाला इतर व्यक्ती संचालकाच्या लायकीची वाटली नाही का? अशा नेते व उमेदवार यांना सभासदांनी वेळीच रोखावे त्यांच्या भुलथापांना बळी पडू नये. सत्तेत आल्यावर हे “अहित” केल्याशिवाय राहणार नाहीत. तसेच दुसऱ्या एका मंडळाचे नेते स्वतःभोवल्यावर चढले आहेत. काहींची सेवा सुद्धा पाच वर्षापेक्षा कमी राहिली आहे, हे सत्तेच्या नशेमुळेबँकेच्या निवडणुकीत उतरलेले आहेत. यांना सुद्धा सभासदांनी वेळीच आवर घालावी, अन्यथा हे बँकेमध्ये सत्तेवर आल्यानंतर एक- दोन टक्क्याने व्याजदर वाढवूनसभासदांची दिशाभूल करून सभासदांच्या खिशाला कात्री लावल्याशिवाय राहणार नाहीत. याची सभासदांनीवेळीच दखल घेऊन गुरुमाऊली2015, शिक्षक भारती संघटना, एकल शिक्षक मंडळ व ऐक्य मंडळाच्या योग्य उमेदवार व मंडळाला मतदान करावे असे आवाहन सांस्कृतिक विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष विकास बगाडे यांनी केले आहे.





