जामखेड न्युज——
मराठी शाळा बंदिविरुद्ध छात्र भारतीचे आंदोलन
एसटी बसेसला चिटकवले निषेधाचे पोस्टर्स !

जिल्हा परिषदेच्या १७ हजार मराठी शाळा बंद करण्याच्या हालचाली महाराष्ट्र सरकारच्या सुरू असल्याने त्याविरुद्ध वेगवेगळी आंदोलन सुरू आहेत. आज छात्र भारतीय विद्यार्थी संघटनेच्या वतीने संगमनेर बस स्थानकांमध्ये मराठी शाळा बंदीच्या निषेधार्थ १०० एसटी बसेसवर निषेधाचे पोस्टर्स चिटकविण्यात आले.

या पोस्टवर विविध घोषण लिहिण्यात आल्या होत्या. त्यामध्ये शिंदे साहेबांना सांगाल काय शाळा बंद करू नका, मराठी शाळा वाचल्याच पाहिजेत, सरकारी शाळा आमच्या हक्काच्या नाही कुणाच्या मालकीच्या.

पटसंख्या कमी असल्याने सरसकट १७ हजार मराठी शाळा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होणार आहे.

आदिवासी विद्यार्थ्यांचे शिक्षणात हाल होणार आहेत. ते शिक्षणापासून वंचित राहतील. ग्रामीण आणि दुर्गम भागातील मुलांना तर शाळा काय आहे हे देखील माहीत होणार नाही. पर्यायाने समाजाचे फार मोठे नुकसान होणार आहे.

त्यामुळे या शाळा बंद करण्यात येऊ नयेत यासाठी छत्र भारती आंदोलन करत आहे. आज सकाळी छात्रभरतीच्या कार्यकर्त्यांनी संगमनेर शहरातील बस स्थानकावरून जाणाऱ्या एसटी बसेस वर निषेधाचे पोस्टर्स चिटकवले. यावेळी छात्र भारतीचे राज्य कार्यवाह अनिकेत घुले, राज्य कार्यकारणी सदस्य गणेश जोंधळे, जिल्हा अध्यक्ष राहुल जऱ्हाड, तुषार पानसरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.




