जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज——
नगरसेवक मोहन पवार यांच्या वतीने आमदार रोहित पवारांच्या उपस्थितीत महाप्रसादाचे आयोजन!!!
नेहमीच सामाजिक व धार्मिक कार्यात अग्रेसर असणारे नगरसेवक मोहन पवार यांच्यावतीने संतोषी माता मंदीर येथे महाप्रसाद वाटपाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी कर्जत जामखेडचे कार्यकुशल आमदार आ.रोहित पवार हेही उपस्थित राहणार आहेत.
साधारणपणे नवरात्र उत्सवाचे महत्त्व कोजागिरी पौर्णिमे पर्यंत महत्त्व असते. याचेच औचित्य साधून माजी नगरसेवक मोहन पवार यांचा वतीने व आ. रोहित पवार यांच्या उपस्थितीत या महाप्रसाद वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन उद्या दि. ९ आॅक्टोबर रोजी सकाळी ११ : ५० वाजता नागेश विद्यालयाच्या पाठीमागे असलेल्या संतोषी माता मंदीरात हा कार्यक्रम संपन्न होणार असल्याची माहिती मोहन पवार यांनी दिली आहे.
मातोश्री लाल आखाडा व युवा शक्ती प्रतिष्ठान जामखेड यांच्या वतीने या महाप्रसाद वाटपाचे आयोजन करण्यात आले असुन भाविक भक्तांनी व परिसरातील नागरिकांनी या महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन नगरसेवक मोहन पवार यांनी केले आहे.
आमदार रोहित पवारांसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत तेव्हा कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन नगरसेवक मोहन पवार यांनी केले आहे.