४० वर्षापासून पुनर्वसीत गावास अद्याप रस्ता नाही – ॲड डॉ अरुण जाधव रस्त्याचा प्रश्न सोडवू- गटविकास अधिकारी प्रकाश पोळ

0
253

 

जामखेड न्युज——

४० वर्षापासून पुनर्वसीत गावास अद्याप रस्ता नाही – ॲड डॉ अरुण जाधव – रस्त्याचा प्रश्न मार्गी लावू गटविकास अधिकारी प्रकाश पोळ

गटविकास अधिकारी प्रकाशजी पोळ साहेब यांनी लेखी पत्र दिले. व म्हणाले की उद्या आम्ही यासंदर्भात सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहोत. आणि शिकरे वस्ती ते महारनवर वस्ती वाकी ह्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावू.

दि.७ ऑक्टोबर रोजी शिकारे वस्ती (बाळगव्हाण) ते महारनवर वस्ती (वाकी) या रस्त्याचे काम तातडीने चालू व्हावे. यासाठी (वाकी) लक्ष्मी नगर येथे समस्त ग्रामस्थ, शाळकरी मुल- मुली व ॲड डॉ अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण चालू करण्यात आले होते.

यावेळी ग्रामस्थ व महिला, शाळकरी मुलं- मुली यांनी रस्त्याच्या संदर्भात भूमिका मांडल्या. तसेच ॲड. डॉ. अरुण जाधव यांनी मनोगत मांडले. व पुढे म्हणाले की १९८८ रोजी खैरी प्रकल्प वाकी ता. जामखेड येथे पाणी साठवण धरण बांधण्यात आले. त्यामध्ये ५ गावचे भूसंपादन करण्यात आले. तसेच काही गावे स्थलांतरित करण्यात आली. यामध्ये वाकी हे गाव १००% स्थलांतरित झाले. परंतु शासनामार्फत दिल्या जाणाऱ्या सोयी- सुविधा (रस्ते, शाळा, वीज व पाणी) पुरवण्यात आलेले नाही. ७५ वर्ष झाली देशाला स्वातंत्र्य मिळवून. अमृत महोत्सव ही साजरा झाला. परंतु अजूनही वाकी (लक्ष्मी- नगर) या गावाला रस्ता, पाणी, वीज मिळालेली नाही.

या मागणीसाठी वारंवार शासकीय दरबारी पाठपुरावा करून देखील कुठल्याही पद्धतीचा लाभ मिळालेला नाही. रस्ता व्यवस्थित नसल्याने महिलांच्या बाळतपण घरीच करावे लागते. मुलांना शाळेत जात येत नसल्याने अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतात. दळणवळण व्यवस्थित नसल्याने शेतकरी आपला शेतमाल मार्केटला नेहु शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे व त्यांच्या शेतीमालाचे प्रचंड नुसकान होत आहे. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत आहेत. तसेच शेतकरी आत्महत्या करत आहेत.

  या सर्व अडचणीचा तातडीने विचार करून हा प्रश्न सुटावा. यासाठी आम्ही वाकी गावचे ग्रामस्थ तसेच महिला, शाळकरी मुलं-मुली उपोषणास बसलो आहे. काही दिवसापूर्वी एका मुलाला सर्पदंश झाला होता खराब रस्ता असल्याने तो दवाखान्यापर्यंत पोहोचू शकला नाही. व एका महिलेच्या बाळतपानाच्य वेळी तिला दवाखान्यात पोहोचता आले नाही. व तिला आपला जीव गमावा लागला आहे. शासनास विनंती करतो. की लवकरात लवकर हा रस्ता करावा. यावेळी बाबासाहेब शिंदे, सदस्य दशरथ कोळेकर सर, मा. सरपंच दादासाहेब दाताळ पाटील, मा. बाबासाहेब घोडके पाटील, मा. सरपंच अंकुश महारनवर, स्वप्नाली पैठणपगारे, संविधान प्रचारक गणपत कराळे, विशाल पवार, कलावती महारनवर, मंगल पोडमल, सोनाली पैठणपगारे, रखमाबाई कोळेकर, केशरबाई ठोंबरे, झिंगाबाई पैठणपगारे, या सर्वांनी मनोगते मांडली व सूत्रसंचालन संविधान प्रचारक अजिनाथ शिंदे यांनी केले. तसेच गटविकास अधिकारी प्रकाशजी पोळ साहेब, शाखा अभियंता जि. प. सार्वजनिक बांधकाम अनिरुद्ध कुलकर्णी साहेब, नायब तहसीलदार मनोज भोसेकर साहेब, तलाठी अनिता जाधव यांनी लेखी पत्र दिले. व उपोषण मागे घेण्यास विनंती केली. यावेळी उपस्थित. शिवाजी कदम, शरद कदम, श्रीकांत सोरटे, दादा सोरटे, उपेंद्र महारनवर, संतोष चव्हाण व महिला, पुरुष गावकरी, शाळकरी मुलं-मुली उपस्थित होते…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here