जामखेड न्युज——
जवळा गट रोहोकले प्रणित गुरूमाऊली मंडळा बरोबरच..!
शिक्षक बँकेवर विजयी पताका फडकवणारच… अध्यक्ष राजेंद्र मोहोळकर
जामखेड तालुक्यातील रोहोकलेप्रणित गुरूमाऊली मंडळाच्या झंझावाती प्रचार दौ-या निमित्ताने शिक्षक परिषदेचे तालुका अध्यक्ष राजेंद्र मोहोळकर बोलत होते.
२०१६ पूर्वी शिक्षक बँकेचा आर्थिक डोलारा ब-यापैकी कोलमडला होता.कर्जवितरण महिना महिना बंद होते. अशा परिस्थितीत रोहोकले गुरूजींनी बँकेला आर्थिक स्थैर्य मिळवून दिले. बँक आर्थिक दृष्ट्या सक्षम केली. त्यामुळे तत्कालिन फुटीर मंडळाने आयत्या पिठावर रेघोट्या मारून फक्त खाण्याचे उद्योग केले. त्यामुळे रोहोकलेगुरूजींचे कार्य विरोधकही खाजगीत मान्य करतात.परंतु निवडणुकीत आरोप प्रत्यारोप होत असतात.
सर्वसामान्य शिक्षकांमध्ये आजही रोहोकलेगुरूजी प्रणित गुरूमाऊलीकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक आहे.त्यामुळे पुन्हा एकदा शिक्षक बँकेवर रोहोकलप्रणित गुरूमाऊलीचीच विजयी पताका फडकणार असल्याचा विश्वास मोहोळकर यांनी व्यक्त केला.
जामखेड तालुक्यात गुरूमाऊलीच्या झंझावाती प्रचार दौरा सुरु असून . यावेळी शाळा शाळावर गुरूमाऊलीच्या उमेदवारांचे उस्फुर्त स्वागत करण्यात येत आहे.
जवळा भागातील सर्वसामान्य शिक्षक सभासद मा. रोहोकले प्रणित गुरुमाऊली मंडळाबरोबरच आहेत. कोणताही दुजाभाव जवळा गटावर मंडळाने केला नाही आणि रोहोकले प्रणित गुरुमाऊली मंडळाचा विजय हा निश्चित आहे.असा विश्वास यावेळी मारुती रोडे,शिवाजी हजारे, अनिल आव्हाड , राजेंद्र आप्पा मोहळकर,विष्णू मोहळकर,नवनाथ हजारे,संजय हजारे,राजेंद्र हजारे,दत्ता कोल्हे , संजय हजारे नान्नज, दादा राऊत , घोडके सर, मस्के सर,सुभाष फसले, सुभाष सरोदे, मिलींद आव्हाड ,अस्तिक हजारे, बाळासाहेब रोडे, विकास हजारे, सागर कळसकर ,अतुल कोल्हे , हिंगणे सर , अनिल शिंदे, .अशोक हजारे,गणेश रोडे सह अनेक शिक्षक सभासद उपस्थित होते.