जामखेड न्युज——
युवकांचे प्रेरणास्रोत बनलेत प्रा. सचिन गायवळ!!!
खर्डा शहरासह गटातील सर्वच गावात त्यांच्या हस्ते
देवीची आरती
सामाजिक कार्यकर्ते प्रा. सचिन गायवळ सर यांनी आपल्या समाजसेवेतून जामखेड तालुक्यातील लोकांची मने जिंकली आहेत. त्यामुळे खर्डा शहरासह संपूर्ण गटात प्रा. सचिन गायवळ यांच्या हस्ते आरती करण्यात आली. प्रत्येक गावात सचिन गायवळ यांचे ढोल ताशा व फटाक्यांच्या आतषबाजीने तसेच फुले टाकून स्वागत करण्यात आले. नेता कसा असावा याचा सुंदर परिपाक म्हणजे गायवळ सर आहेत. अशी सामान्य जनतेची भावना आहे.
सामाजिक कार्यकर्ते सचिन गायवळ सरांनी आतापर्यंत पदरमोड करत अनेक समाजोपयोगी कामे मार्गी लावली आहेत. रस्ते, पिण्याच्या पाण्याची सोय, शाळांना मदत, वृक्षारोपण, गोरगरिबांना मदत तसेच अनेक भांडणे समजोता करत गावातच मिटवली आहेत त्यामुळे गायवळ सरांविषयी जनतेच्या मनात प्रचंड प्रेम जिव्हाळा आहे. नेता कसा असावा याचा सुंदर परिपाक म्हणजे गायवळ सर आहेत.
दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी
अनाथनाथे अंबे करूणा विस्तारी
या ओळीप्रमाणे अनाथांचे नाथ, गोरगरीबांचे कैवारी, निराधारांचे आधार असलेले जामखेड तालुक्याचे सुपुत्र पुणे बास्केट बाॅल असोसियशनचे सचिव मा, प्रा सचिन सर गायवळ यांनी खर्डा गटातील सर्वच गावा मधे दुर्गा माता जगदंबेच्या आरतीस ग्रामस्थांनसोबत उपस्थित राहुन जगदंबा मातेचे आशिर्वाद घेतले.
खर्डा शहर व खर्डा गटातील सर्वच ग्रामस्त,वृध्द,महीला,बाळगोपाळ,युवक,युवती यांना नवरात्र उत्सहाच्या शुभेच्छा दिल्या त्याप्रसंगी खर्डा गटातील सरपंच, उपसरपंच, ग्रा पं सदस्य, चेअरमन, व्हाइस चेअरमन, संचालक व लहान , थोर ग्रामस्त मोठ्या प्रमाणात उपस्थित होते,
एक निस्वार्थ समाजसेवक कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे प्रा. सचिन गायवळ सर
राजकारणाशिवाय समाजकारण , आणि समाजसेवा कशी करायची याचा आदर्शच प्रा सचिन गायवळ सरांनी समाज, राजकारणी आणि तरुणांपुढे घालुन दिलाय आणि त्यामुळेच प्रा. सचिनसर गायवळ यांची लोकप्रियता खर्डा परीसर आणि जामखेड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर आहे,
कुठलाही राजकीय वारसा नसतानाही खर्डा परसरातील सर्वसामान्य जनता प्रा सचिन गायवळ यांना आपल्या हक्काचा युवा नेताचं मानते,
खर्डा परीसरात सर्वसामान्य, गोरगरीब जनतेची अडचण कुठलीही असो प्रा सचिन गायवळ नेहमीचं निस्वार्थ भावनेने मदतीस तत्पर हजर असतात म्हणुनचं प्रा सचिन गायवळ खर्डा परीसरतील युवकांचे प्रेरणास्रोत बनलेत.
आई जगदंबेच्या चरणी एवढीच प्रार्थना
राहो प्रा. सचिन गायवळांच्या हातुन अशीचं निस्वार्थ समाजसेवा घडत राहो अशा प्रकारे भावना सर्वसामान्य नागरिकांनी व्यक्त केली आहे.