जामखेड प्रतिनिधी
जामखेड येथील सौ.मिताली तेजस बोरा ३१ (मासखमन) उपवासाची सांगता
शुक्रवार दिनांक २३/९/२०२२ रोजी सकाळी १०=०० वाजता जामखेड जैन स्थानकामध्ये होणार आहे अशी माहिती बोरा यांनी दिली.
परमपूज्य चंदनबालाजी म.सा. आणि परमपूज्य पद्मावतीजी म.सा. आदी ठाणा ६ यांच्या सानिध्यात आणि परमपूज्य विधीजी महाराज साहेब आदि ठाणा ३( तीन ) राशीन यांच्या प्रेरणेने सौ मिताली तेजस बोरा यांनी निरंकार ३१ (एकतीस) उपवास करण्याचे धाडस केले आहे या अगोदर बोरा परिवारातील मितालीच्या सासुबाई सौ. प्रमिला नंदुलाल बोरा यांनी पण १५ उपवास केले होते सौ मिताली बोरा यांनी पजुसण बसण्याच्या दिवशी पहिला उपवास केला त्या दिवसापासून उपवास चालू केले आहेत जामखेड मध्ये जैन स्थानकामध्ये चातुर्मास प्रोग्राम तब जाप, आराधना, एकासना, आंबील तेला, आठ उपवास, अकरा उपवास ,पंधरा उपवास ,३१ उपवास अशा तपस्या जोरात चालू आहेत तरी तालुक्यातील सर्व जैन बांधवांनी पचकावणी साठी हजर राहावे.
सकाळी आठ वाजता त्यांच्या निवासस्थाना वरून वरघोडा (मिरवणूक)निघणार आहे.
नऊ वाजता प्रवचन चालू होऊन दहा वाजता जामखेड जैन स्थानका मध्ये पचकावणी होणार आहे तसेच अकरा वाजता भावा आणि माहेरा जैन स्थानकात होणार आहे त्यानंतर जैन श्रावक संघ आणी बोरा परिवारा तर्फे गौतम प्रसादी ठेवली आहे तरी सर्व कार्यक्रमास हजर राहावे असे नंदूलाल तुषारकुमार बोरा यांनी निमंत्रण दिले आहे