जामखेड न्युज——
आमदार रोहित पवारांच्या वाढदिवसानिमित्त युवा नेते महेश राळेभात यांच्या तर्फे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊचे वाटप
आ रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शालेय साहित्याचे व खाऊचे वाटप युवा नेते महेश रामचंद्र राळेभात यांच्या वतीने करण्यात आले
जामखेड तालुक्यात आ रोहित पवार यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा होत आहे यामध्ये नेत्र तपासणी मोफत चष्मे वाटप,साखर,हिमोगबिन तपासणी अशा उपक्रमांनी वाढदिवस साजरा होत आहे.
आज 20 सप्टेंबर रोजी युवा नेते महेश राळेभात मित्र परिवार यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दत्त नगर जामखेड येथे वह्या,पेन,अशा शालेय साहित्याचे व खाऊचे वाटप करण्यात आले
यावेळी महेश राळेभात म्हणाले रोहित दादांचा वाढदिवस इतरत्र खर्च करून करण्यापेक्षा समजउपयोगी वस्तूचे वाटप करून साजरा केला पाहिजे म्हणून मी आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वह्या पेन खाऊचे वाटप करून साजरा केला आहे
यावेळी आ रोहित दादा बोलताना म्हणाले की महेश राळेभात चे कौतुक करतो की माझ्या वाढदिवसानिमित्त छान उपक्रम राबविला की शाळेतील लहान मुलांना वह्या ,पेन व खाऊचे वाटप केले त्याबद्दल त्याचे कौतुक करतो
यावेळी रमेश आजबे, विजय कोठारी, घनश्याम अडाले, पवन राळेभात, अमोल गिरमे, केंद्रप्रमुख नारायण राऊत, महेश निमोणकर, प्रवीण उगले, पिंटू बोरा, बजरंग मुळे, मनोज राळेभात, अमोल खैरे, अनिकेत बांदल, गणेश मस्के, राजू चेमटे, विनोद पवार, उमेश राळेभात, आकाश घागरे,प्रवीण कसाब, मनोज अडाले, युवराज जगताप,महेश राळेभात, गौरव राळेभात, सूरज राळेभात,आकाश उगले, मनोज डाडर, विकी उगले, शिवराज घुमरे, जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक मोहळकर सर, मकुडे सर,बडे मॅडम व सर्व शिक्षक-शिक्षिका व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.