वंचित भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांना जातीचे दाखले, आधार कार्ड , कुपन देण्यासाठी वाडी वस्तीवर कॅम्पचे आयोजन – राज्याचे मुख्य निवडून आयुक्त श्रीकांत देशपांडे मोहा येथे राज्यव्यापी भटके विमुक्त महिला परिषद संपन्न

0
238

जामखेड प्रतिनिधी
                  जामखेड न्युज——

वंचित भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांना जातीचे दाखले, आधार कार्ड , कुपन देण्यासाठी वाडी वस्तीवर कॅम्पचे आयोजन – राज्याचे मुख्य निवडून आयुक्त श्रीकांत देशपांडे

मोहा येथे राज्यव्यापी भटके विमुक्त महिला परिषद संपन्न

आदिवासी, भटक्या विमुक्त प्रवर्गातील लोकांना जातीचे दाखले, जात वैधता प्रमाणपत्र, मतदान कार्ड, आधार कार्ड व रेशन कार्ड मिळवून देण्यासाठी आवश्यक असलेल्या जाचक अटी शिथिल करुन त्यांना त्यांच्या वस्तीवर हे सर्व कागदप्रत देण्यासाठी ठिकठिकाणी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात येईल. असे आश्वासन राज्याचे मुख्य निवणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिले.

राज्यातील भटके विमुक्त संघटना, समूह व संस्थांच्या वतीने शुक्रवार दिनांक 16 सप्टेंबर रोजी निवारा बालगृह समता भूमी, मोहा फाटा जामखेड येथे आयोजित राज्यव्यापी भटके विमुक्त महिला परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, विजेएनटी विभागाचे संचालक सिद्धार्थ झाल्टे, सहायक समाज कल्याण आयुक्त राधाकिसन देवडे, अजित थोरबोले, तासिलदार योगेश चंद्रे, जामखेड चे पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, कोरो मुंबईच्या सुजताताई खांडेकर, महेंद्र रोकडे, मुमताज शेख, पल्लवी पालव, सूर्यकांत कांबळे, वैशाली रायते राहुल गवारे, सुजाता लवांडे, सुप्रिया काळे, प्रियांका तुपे, पुनम भिस्ट, ग्रामीण विकास केंद्राचे संस्थापक ॲड अरुण जाधव, सचिव उमाताई जाधव, संचालक बापु ओहोळ, शांताराम बापू पंदेरे, प्रा. विष्णु जाधव, कबीर कांबळे, रंजना गावांदे, सूवर्णामाला मस्के आदी या वेळी उपस्थित होते.

या वेळी बोलताना श्रीकांत देशपांडे म्हणाले की, आदिवासी व भटके विमुक्त प्रवर्गातील महिलांमध्ये मोठया प्रमाणावर आश्वासक नेतृत्व क्षमता आहे त्या महीला परिस्थिती बदलू शकतात मात्र त्यासाठी वंचित घटकाचा समावेश खऱ्या अर्थाने लोकशाही मध्ये झाला पाहिजे.

समाज कल्याण खात्याचे आयुक्त व प्रशांत नारनवरे म्हणाले कि, आदिवासी व भटके विमुक्त प्रवर्गातील लोकांना विविध शासकीय कागतपत्रे मिळवून देण्यासाठी प्रशाकिय पातळीवर सर्वतोपरि सहकार्य केले जाईल. या वेळी सुजाताताई खांडेकर, ॲड. अरुण जाधव यांची हि भाषणे झाली.

उद्घाटना नंतर सुनिता भोसले यांच्या अध्य्षतेखाली महीला परिषद मागणी आणि शासनाच्या भूमिका या विषयावर चर्चा सत्र झाले. भटक्या विमुक्त समूहाची सध्यस्थिती या विषयावर ॲड अरुण जाधव यांनी भूमिका मांडली भटक्या विमुक्त समूहातील महिलांची सामजिक, आर्थिक व राजकीय परिस्थिती या विषयावर प्रियांका जाधव यांनी आपले विचार व्यक्त केले. व्यक्तिगत व कामाच्या पातळीवरील अनुभवाची मांडणी व्दारकाताई पवार, ललिता धनवटे, लता सावंत, छाया भोसले, ज्योती भोसले यांनी मांडणी केली, रंजना गवांदे यांनी भटके विमुक्त समूहातील अंधश्रद्धा व जात पंचयतीस मूठमाती या विषयावर भाष्य केले तर प्रा. मंगलताई खिवसरा यांनी भटके विमुक्त समाजातील समस्या सोडवण्या साठी उपाय योजना सांगितल्या. डॉ सोनाली मस्के यांनी भटक्या विमुक्त महिलांची शैक्षणिक स्थिती मांडली. प्रा. डॉ बाळासाहेब बळे यांनी फासेपारधी समुहा सोबतचे काम आणि रणनिती या विषयावर भाष्य केले. प्रा. अंजली मायदेव यांनी भटक्या विमुक्त समूहातील महिलांचे राजकीय नेतृत्व आणि आव्हाने या विषयावर दूरदृष्यप्रणाली द्वारे महिलांशी संवाद साधला.

दुपारच्या सत्रात पत्रकार भगवान राऊत यांनी संपादित केलेल्या आम्ही घडलो या पुस्तकाचे प्रकाशन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, यांच्या हस्ते व प्रमूख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. परिषदेच्या समारोप सत्रात विविध ठराव संमत करण्यात आले. आदीवासी भटके विमुक्त समाजासाठी असणाऱ्या विविध योजनांची माहिती भटके विमुक्त विभागाचे संचालक सिद्धार्थ झाल्टे यांनी दिली. कोरो संस्थेच्या संस्थापक सचिव डॉ सुजाता खांडेकर यांनी भटके विमुक्त समूह आणि त्यातील महिलांच्या पुढील कामाची दिशा स्पष्ट केली. सुनिता भोसले यांच्या भाषणाने या परिषदेचा समारोप झाला.

प्रसिद्ध विद्रोही शाहीर सचिन माळी, शितल साठे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केलेल्या नवयान शाहिरी जलश्याने कार्यक्रमास पारंभ झाला. मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्या हस्ते व समाज कल्याण आयुक्त डॉ प्रशांत नारनवरे यांच्या प्रमूख उपस्थितीत सोलापूर सेटमेंटच्या प्रतिकृतीचे प्रवेशव्दार उघडून त्यातील प्रातिनिधिक स्वरूपातील भटक्या कलावंतांना मुक्त करुन आगळ्या वेगळ्या पद्धतीने या परिषदेचे उद्घाटन झाले.

शैला याधव यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. बापू ओहोळ यांनी आभार मानले. मांडले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उमाताई जाधव, भगवान राऊत अरुण डोळस, सचिन भिंगारदिवे, आतिश पारवे, व्दारका पवार, अतूल ढोणे राजु शिंदे, संतोष चव्हाण, नंदकुमार गाडे, फरिदा शेख, शुभांगी गोहेर, विशाल पवार, अजिनाथ शिंदे गणपत कराळे, प्रकाश शिंदे, फुलाबाई शेगर, तुकाराम पवार शितल काळे. शाहीर राजगुरू, अनिल लष्कर, वैजिनाथ केसकर, संतोष चव्हाण, तुकाराम शिंदे संगिता केसकर, मोहीते मॅडम, ऋषिकेश गायकवाड, मच्छिंद्र जाधव, अंकुश पवार, सपना पवार, विशाल जाधव, मोहन शिंदे संतोष भोसले, छाया भोसले, उज्वला मदने, काजुरी पवार, डीसेना पवार, कायदेशीर पवार, ज्योती भोसले, सुनिता बनकर, पल्लवी शेलार, लता सावंत, नरसिंग भोसले, शरद काळे, शेख भाभी लाला वाळके भीमराव सुरवसे, शारदा जाधव, सुनिता कांबळे, ऋषाली कांबळे, हुसेन मदारी, जयेश कांबळे, गोविंद तांदळे, पोपट फुले, भिमराव चव्हाण, भाऊराव सावंत, गणेश पवार पुलाबाई भोसले, बाळू तांदळे, मंगल धनवे, सुरेखा सदाफुले, सुरेखा घयतडक, सुचिता नवे मुनीर शिखलकर, बाबूसिंग पवार, ललिता धनवटे, पपीता माळवे, संदीप आखाडे, मनीषा घुले, हनुमंत बारबोले, विजय शिंदे, अजित थोरबोले, रमेश यादव, आदींनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here