जामखेड न्युज——
रोजगारासाठी हिंदी भाषेचे ज्ञान आवश्यक
जामखेड महाविद्यालयात हिंदी दिन साजरा
हिंदी ही रोजगार निर्मितीची भाषा आहे. हिंदी भाषा राजभाषा,राष्ट्रभाषा आहेच.आज ती विश्व भाषेच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहे. केवळ बोलचालीचे साधन नव्हे तर यु.पी. एस.सी.,स्टाफ सिलेक्शन, नॅशनल बँका,रेल्वे ,पोस्ट अशा विविध क्षेत्रात हिंदी भाषेचे स्थान अत्यंत महत्वाचे आहे.
हिंदी भाषेचे ज्ञान आत्मसात केले तर महाराष्ट्रातील मुले देखील केंद्र सरकारच्या विविध विभागात उच्च पदावर विराजमान होतील. हिंदी भाषेचा प्रचार प्रसार समाजातील सर्व स्तरावर व्हावा,असे मत महाराष्ट्र बँकेचे जामखेड शाखेतील डेप्युटी मॅनेजर सतीश पवार यांनी व्यक्त केले. जामखेड महाविद्यालयात हिंदी विभाग द्वारा आयोजित ‘हिंदी दिन ‘ समारंभ प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुनील नरके होते. हिंदी विभाग प्रमुख डॉ. रत्नमाला देशपांडे यांनी प्रास्ताविक केले,तर सूत्रसंचालन डॉ म्हस्के सर यांनी केले.प्रा.तरटे सरांनी आभार मानले.या कार्यक्रमास मा.संदीप सुद्रिक, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.