आपले मत मौल्यवान आहे ते विकू नका -मुख्य निवडणूक आयुक्त श्रीकांत देशपांडे,  लोकशाही बळकट करण्यासाठी शंभर टक्के मतदान आवश्यक

0
206
जामखेड न्युज——
आपले मत मौल्यवान आहे ते विकू नका -मुख्य निवडणूक आयुक्त श्रीकांत देशपांडे     लोकशाही बळकट करण्यासाठी शंभर टक्के मतदान आवश्यक
     लोकशाही बळकट करण्यासाठी शंभर टक्के मतदान होणे आवश्यक आहे. आपले मत खुप मौल्यवान आहे. ते विकू नका. कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नका. सर्व मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला तर लोकशाही प्रगल्भ होईल असे मत महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी व्यक्त केले. 
   
महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे हे जामखेड तालुक्यातील मोहा येथील निवारा बालगृह येथे आयोजित भटक्या विमुक्त जमातीच्या राज्यस्तरीय महिला परिषदेला उपस्थित होते. परिषद झाल्यानंतर शासकीय विश्राम गृह येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी अजित थोरबोले, तहसिलदार  योगेश चंद्रे, तहसीलदार नानासाहेब आगळे, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, निवडणुक नायब तहसिलदार मनोज भोसेकर यांच्या सह अनेक अधिकारी उपस्थित होते. 
    यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, 
लोकशाहीचा पाया बळकट करण्यासाठी सर्वानी मतदान करणे आवश्यक आहे. भटक्या विमुक्त समाजासाठी गावोगावी कॅम्प घेऊन त्यांची मतदार नोंदणी सुलभ करण्याच्या सूचना स्थानिक अधिकारी यांना दिल्या आहेत असेही सांगितले. 
   आधार मतदरयादीला लिंक करण्यासाठी १ एप्रिल २०२३ पर्यंत शंभर टक्के काम करायचे आहे. आता वर्षातून चार वेळा मतदार नोंदणी करता येणार आहे. शंभर टक्के मतदान करण्यासाठी जनजागृती गरजेची आहे. असेही देशपांडे यांनी सांगितले. 
  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here