मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह भाषेत वादग्रस्त विधान करणारे जळगावचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले निलंबित

0
185

 

जामखेड न्युज——

मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह भाषेत वादग्रस्त विधान करणारे जळगावचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले निलंबित

मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह भाषेत वादग्रस्त विधान करणारे जळगावचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले निलंबित रात्रीच यासंदर्भातील आदेश जारी करण्यात आले. 

जळगावमधील स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मराठा समाजाबाबत अपशब्द वापरल्याप्रकरणी निलंबित करण्यात आलं आहे. बकाले यांना निलंबित करण्याचे आदेश रात्रीच्या सुमारास निघाले असून याबाबतची माहिती जळगावचे पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे यांनी दिली. तसेच या प्रकरणावरुन इशारा देणाऱ्यांनाही मुंढे यांनी शांततेचं आवाहन केलं आहे. कायदा व सुव्यवस्थेला बाधा होऊ शकते असं कोणतेही कार्य करू नये असं आवाहन मुंढे यांनी केलं आहे.

“पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले हे १ नोव्हेंबर २०२० पासून जळगावमधील स्थानिक गुन्हे शाखेत कार्यकरत आहेत. त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील नेमणुकीत असलेल्या एका पोलीस अंमलदारासोबत विशिष्ट समाजाबाबत अत्यंत आक्षेपार्ह, घृणास्पद, निंदनीय आणि विशिष्ट समाजाच्या भावना भडकवणारे संभाषण केल्याची ऑडिओ क्लीप व्हायरल झाली आहे.

त्यांनी पोलीस निरीक्षक दर्जाच्या महत्त्वाच्या व जबाबदारीच्या पदावर कार्यरत असताना, उच्च नैतिक मुल्यं बाळगून, लोकांप्रती सौजन्य आणि सद्वर्तन ठेवणे अपेक्षीत होते. असं असतानाही त्यांनी विशिष्ट समाजाबद्दल अथ्यंत खालच्या दर्जाच्या भाषेचा वापरक केला आहे. व्हायरल ऑडीओ क्लीपमधील संभाषणामुळे विशिष्ट समाजात चुकीचा संदेश जाऊन पोलीस दलाची प्रतिमा मलिन झाली आहे. त्यांच्या या अत्यंत बेशिस्त आणि बेजबाबदारपणाच्या गैरवर्तनामुळे मोठ्या प्रमाणात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रस्न निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे,” असं नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ, बी. जी. शेखर पाटील यांनी जळगावचे पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे आणि सहाय्यक पोलीस अधीक्षकांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here