आमदार रोहितदादा यांच्यावर बोलण्याआधी आमच्याशी थेट सामना करावा आगामी जि.प. पं.स. निवडणूकीत घमेंडखोर स्वयंघोषित इच्छुकांना अस्मान दाखवणार -हनुमंत पाटील

0
283

 

जामखेड न्युज——

आमदार रोहितदादा यांच्यावर बोलण्याआधी आमच्याशी थेट सामना करावा

आगामी जि.प.पं.स. निवडणूकीत घमेंडखोर स्वयंघोषित इच्छुकांना अस्मान दाखवणार – हनुमंत पाटील

 

मा.मंत्री राम शिंदे यांनी आमदार रोहितदादा पवार यांना विधानसभेचा राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवण्याचे आवाहन आमदार रोहितदादा पवार यांनी हे आवाहन स्वीकारल्याने पुन्हा आपला पराभव होईल या भीतीने माजीमं त्र्यांच्या कार्यकर्त्यांनी यू-टर्न मारत “राम शिंदेंनी राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नाही” असे म्हणत सोशल मीडियावर बरळत आहेत. 

असे कागदी घोडे तथा डिजिटल घोडे नाचवले आहेत,
आमदार रोहितदादा पवार यांनी आपल्या अडीच वर्षाच्या कारकिर्दीत जामखेड तालुका आणि शहराचा चेहरामोहरा बदलण्याचे काम केले आहे.

गोरगरीब, शोषित, पीडित नागरिकांना सन्मानाचे स्थान दिले आहे. म्हणूनच सर्वसामान्य जनता आमदार रोहितदादा यांच्यासोबत आहे, हेच कुठेतरी तुमच्या नेतृत्वाला बोचत आहे म्हणून राजीनामा द्या, अमुक करा, तमुक करा हे उद्योग सुरू आहेत तेथेही दादांनी तयारी दाखविल्यानंतर मात्र सपशेल माघार घेत तुमच्याच हातात पंचवीस वर्षे सत्ता असताना देखील ज्या खड्डयांचा विषय तुम्ही सोडवू शकले नाहीत तोच उकरून काढला,

हे म्हणजे असं झालं आपल्याच डबक्यात आपण डुंबून आपली घाण अंगावर घेत चिवडत बसायची आणि इतरांकडे बोट दाखवायचे.तुमच्या अपयशाची साक्ष हे खड्डे देत आहेत पण
असो तुमचा हा दोष धुवून काढण्यासाठी आ.रोहितदादा यांनाच यावे लागले. 

याही पातळीवर आ.रोहितदादा यांनी यशस्वी मार्ग काढत केंद्रीय स्तरावर पाठपुरावा करत वाढीव निधी मंजूर करून नगर-जामखेड महामार्गाचा प्रश्न निकाली काढला आहे येत्या नोव्हेंबर मध्ये रस्त्याचे काम देखील सुरू होणार आहे.

यानिमित्ताने एवढेच सांगायचे आहे दुसऱ्या फळीतील तथाकथित नेत्यांनी आपली पत, आपली क्षमता, आपल्यातील असणारी जाणीव ओळखून आमदार रोहितदादांवर टीका करावी, विधानसभा तर लईच लांब पण त्याअगोदर तुमची ‘स्वप्नांची सैर’ आगामी जि.प.पं स. नगरपालिका निवडणुकीत आम्ही मोडणार आहोत हे लक्षात असुद्यात त्यांनतर मात्र आपली पळताभूई थोडी होईल व आपनच आपल्या नेतृत्वावर शंका उपस्थित कराल हे नक्की असे हनुमंत पाटील यांनी म्हटले आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here